11:48pm | May 25, 2020 |
सातारा : आज सकाळी कराड येथील कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयातून दोघा कोरोना मुक्त झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच वाई तालुक्यातील दोघा कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून आज संध्याकाळी उशिरा जिल्ह्यात 27 नवीन कोरोना बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 336 वर पोहोचला आहे.
आज सकाळी क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात वाई तालुक्यातील आसले येथील 70 वर्षीय मधुमेह असलेल्या व कालच कोरोनाबाधित म्हणून आढळून आलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. तसेच वाई तालुक्यातीलच जांबळी येथील 52 वर्षीय कोरोना अनुमानित व्यक्तीचाही मृत्यू झाला त्याचा नमुना तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आला होता. आज रात्री उशिरा त्या व्यक्तीचा अहवाल रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाला असून त्या व्यक्तीचा मृत्यूही कोरोनानेच झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. आज दिवसभरात दोघा कोरोना बाधितांचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या 9 वर पोहोचली आहे.
कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय, कराड येथे आज सकाळी कोरोना बाधित म्हणून दाखल असलेल्या कराड तालुक्यातील 75 वर्षीय महिला व 24 वर्षीय युवकाचे 14 व 15 व्या दिवसाचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे ते दोघेही कोरोनातून खडखडीत बरे झाल्याने त्यांना आज सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी कृष्णा चॅरिटेबलचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले व अधिष्ठाता डॉ. एस. वाय. क्षीरसागर यांनी त्यांना पुष्पगुच्छ देवून निरोप दिला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या 122 झाली आहे. आज रात्री उशिरा कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली असून नव्या 27 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली असून यामध्ये पाचगणीतील 2, जावली तालुक्यातील सायगाव 1, मोरघर 4, सावरी (ग्रा.पं. कसबे बामणोली) 1, वाई तालुक्यातील परतवडी 3, दह्याट 4, आकुशी 1, धावडी 2, जांभळी 1 (मृत्यू), खंडाळा तालुक्यातील आंदोरी 1, सातारा तालुक्यातील रायघर 1, शेळकेवाडी 2, खटाव तालुक्यातील डांबेवाडी 1, कराड तालुक्यातील म्हासोली 1, पाटण तालुक्यातील खळे 1, काळेवाडी (आडू) 1 अशा 27 कोरोना अनुमानितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली असून जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 336 वर पोहोचली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-पुण्यासह देशभरात नोकरी व व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्या मूळ भूमिपूत्रांनी गड्या आपला गावच बरा, असे म्हणत गेल्या दीड महिन्यात गावाकडे धाव घेतली. गेल्या दोन महिन्यांपासून 24 मे अखेर ई-पास घेवून 1 लाख 9 हजार 604 नागरिकांनी सातारा जिल्ह्यात प्रवेश केला असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे. यामध्ये मुंबई-पुणे, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, ओडिसा, कर्नाटक, केरळ, गुजरात, गोवा, झारखंड, तामिळनाडू, तेलंगणा, दादरा नगर हवेली, पंजाब, पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली व हरियाणातून नागरिक आले असून यामध्ये कराड तालुक्यात 12 हजार 671, कोरेगाव 6 हजार 113, खंडाळा 4 हजार 804, खटाव 11 हजार 676, जावली 8 हजार 192, पाटण 12 हजार 463, फलटण 7 हजार 457, महाबळेश्वर 6 हजार 588, माण 10 हजार 341, वाई 8 हजार 985, सातारा 20 हजार 314 अशा एकूण 1 लाख 9 हजार 604 नागरिकांनी जिल्ह्यात प्रवेश केला आहे.
दोन बाधित महिलांची शस्त्रक्रीयेद्वारे प्रसुती
काल दि. 24 मे रोजी कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे बाधित 24 वर्षीय महिलेचे सिझेरियन ऑपरेशनद्वारे सुरक्षीत प्रसुती करण्यात आली. आई व बाळ दोघेही सुखरुप आहेत. तसेच आज पहाटे 3.30 वाजता कंटेन्मेंट झोन भिमनगर, कोरेगाव येथील 22 वर्षीय महिलेची सिझेरियन ऑपरेशनद्वारे सुरक्षीत प्रसुती करण्यात आली. आई व बाळ दोघेही सुरक्षित असून आईच्या घशातील स्त्रावाचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
184 जणांचे घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 12, ग्रामीण रुग्णालय वाई येथील 64, वेणूताई चव्हाण उप जिल्हा रुग्णालय कराड येथील 55, उप जिल्हा रुग्णालय फलटण येथील 48 व ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 5 अशा एकूण 184 अनुमानित नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी. एस. पुणे येथे तपासणीसाठी पाठविले आहेत.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |