08:22pm | Jan 15, 2022 |
कराड : कळंत्रेवाडी, ता. कराड गावच्या हद्दीत मळी वाहतूक करणाऱ्या टॅंकरने अचानक पेट घेतला. शनिवारी 15 रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवल्यामुळे पुढील दुर्घटना टळली. दरम्यान, कराड नगरपालिकेच्या अग्निशामक बंबाला पाचारण केल्यानंतर सुमारे तासाभरानंतर ही आग आटोक्यात आली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, अहमदनगर येथून उकडी कारखान्यातून जवळपास 40 टन मळी भरून आलेला टँकर जयगडच्या (रत्नागिरी) दिशेने चालला होता. टँकर चालकाने शनिवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास नाश्ता करण्यासाठी पाटण- पंढरपूर राज्यमार्गावरील कळंत्रेवाडीनजीक टँकर थांबवला. दरम्यान, टँकरच्या केबिनने अचानकपणे पेट घेतल्याचे टँकर चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर टँकर चालकाने स्थानिकांच्या मदतीने कराड नगरपालिकेच्या अग्निशामक बंबाला पाचारण केले. अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जवळपास तासाच्या परिश्रमानंतर आग विझवण्यात अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.
या दुर्घटनेत सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या दुर्घटनेमुळे पाटण-पंढरपूर राज्य मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. ती स्थानिकांसह उंब्रज पोलीस व अग्निशामक दलाच्या कर्मचार्यांनी सुरळीत केली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |