नवी दिल्ली : मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या 'नीट -2022' राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षेचे (National Eligibility Cum Entrance Test) आयोजन 17 जुलैला करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी ऑनलाई रजिस्ट्रेशन प्रक्रिया 2 एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे.
NTA च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, NEET 2022 परीक्षेचे नोटिफिकेशन आज neet.nta.nic.in या संकेतस्थळावर जाहीर करण्याची शक्यता आहे. मेडिकल आणि डेंटल अंडर ग्रॅज्युएट प्रवेशी परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन 2 एप्रिलपासून सुरू होणार आहे.
NEET 2022 परीक्षेचे अधिकृच वेळापत्रक NTA तर्फे nta.ac.in आज जाहीर करण्याची शक्यता आहे. या परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांनी 7 मे पर्यंत यूजी-नीट परीक्षा 2022 परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. त्यानंतर पाच दिवसांसाठी करेक्शन विंडो खुली करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या अचूक माहितीसाठी nta.ac.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यूजी नीट परीक्षा (NEET-UG 2022) परीक्षेचे आयोजन ऑफलाईन करण्यात येणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या परीक्षेचे आयोजन 13 भाषांमध्ये केले जाणार आहे. यामध्ये इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेचा समावेश आहे. या शिवाय भारतात वापरल्या जाणाऱ्या आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, मल्याळम, ओडिसा, पंजाबी, तामिळ आणि तेलगु भाषेत देखील परीक्षा होणार आहे.
31 डिसेंबर 2022 पर्यंत 17 वर्षे पूर्ण झालेले सर्व विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहे. 2021 मध्ये 16,14,777 विद्यार्थ्यांनी नीट-यूजी परीक्षा परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी 95.6 टक्के विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांपैकी 8,70,074 म्हणजे 56.04 टक्के विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |