12:33pm | Dec 26, 2020 |
मेलबर्न : पहिल्या कसोटी सामन्यात लाजिरवाण्या पराभावाचा सामाना करावा लागलेल्या टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या दुसर्या कसोटी सामन्यात दमदार कामगिरी केली आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळल्या जाणार्या दुसर्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कांगारूंची दाणादाण उडवली. बुमराह - आश्विनने केलेल्या भेदक मार्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव 195 धावांवरच गुंडाळला.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न क्रिकेट मैदानावरील बॉक्सिंग डे कसोटीत जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि मोहम्मद सिराज यांनी केलेल्या शानदार गोलंदाजी केली. भारताकडून बुमराहने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. दुसर्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो बर्न्स आणि मॅथ्यू वेड यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरूवात केली. जसप्रीत बुमराहने पाचव्या ओव्हरमध्ये बर्न्सला शून्यावर बाद करून ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर आर अश्विनने 13 व्या षटकात मॅथ्यू वेडला बाद केले. त्याचा शानदार कॅच रविंद्र जडेजाने घेतला. वेड पाठोपाठ अश्विनने भारताला मोठी विकेट मिळवून दिली. त्याने स्टीव्ह स्मिथला शून्यावर बाद केले. स्मिथ बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाची अवस्था 3 बाद 38 होती.
चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करणारी मार्नस लाबुशाने आणि ट्रॅव्हिस हेड यांची जोडी उमेश यादवने हेडला 38 धावांवर बाद करत फोडली. पदार्पणाचा सामना खेळणार्या मोहम्मद सिराजने मार्नस लाबुशानेची विकेट घेत मोठा अडथळा दूर केला. लाबुशानने 48 धावा केल्या. दुसर्या सत्राचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 5 बाद 136 धावा केल्या होत्या.
पहिल्या दोन सत्राप्रमाणे भारतीय गोलंदाजांनी तिसर्या सत्रात देखील दमदार कामगिरी करत केली. सिराजने कॅमरून ग्रीनला माघारी पाठवले. त्यानंतर अश्विनने कर्णधार टीम पेनला 13 धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला सातवा झटका दिला. तळातील फलंदाजांमध्ये धोकादायक असलेल्या मिचेल स्टार्कला 7 वर बाद करत ऑस्ट्रेलियाची अवस्था 8 बाद 164 अशी केली. बुमराहने फटकेबाजी करून धावांची संख्या वाढवणार्या नॅथन लायनची विकेट घेतली. रविंद्र जडेजाने पॅट कमिन्सची विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 195 धावांवर संपुष्ठात आणला.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |