कराड : राज्य तलाठी संघाच्या वतीने दोन आठवडे काम बंद आंदोलन पुकारले होते. राज्य तलाठी, पटवारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांना इ-प्रकल्प समन्वयक रामदास जगताप यांनी सोशल मीडीयावर अर्वाच्य भाषेत संदेश दिला होता. त्याबद्दल जगताप यांची तात्काळ बदली करण्यात यावी, यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते. परंतु, दोन आठवड्यांनंतर सदरचे आंदोलनास तुर्तास स्थगित करण्यात आले आहे.
१५ दिवसाच्या आत जगताप यांची बदली करण्यात यावी. अन्यथा, राज्य तलाठी संघाच्या वतीने पुन्हा काम बंद आंदोलन सुरु करण्याचा इशारा संघाने महसुलमंत्री बाळासाहेब थोरात व महसुल आयुक्तांना दिला आहे. याबाबतचे निवेदन नुकतेच महसुलमंत्री बाळासाहेब थोरात व महसुल आयुक्तांना राज्य तलाठी संघाच्या वतीने देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांनी सोशल मीडीयावर महसुल खात्याच्या कामकाजाबाबतची पोस्ट टाकली होती. त्याचा चुकीचा अर्थ काढून इ-फेरफार प्रकल्प समन्वयक जगताप यांनी त्यांना अर्वाच्य भाषेत संदेश दिला. त्याचा तलाठी संघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. त्यामुळे राज्य शासनाने जगताप यांची तात्काळ बदली करावी. अन्यथा, नैसर्गिक आपत्ती आणि निवडणुकीचे कामे सोडून सर्व कामे बंद करू. तसेच डीएसीही जमा करू असा इशारा देत सदर आंदोलन सुरु करण्यात आले होते.
त्यानंतर या आंदोलनाला राज्यभरातील तलाठ्यांनी पाठींबा देत या आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवला होता. त्यानुसर राज्यातील तलाठ्यांनी दोन आठवडे काम बंद ठेवले होते.
दरम्यान, तलाठी संघाच्या पदाधिकाऱ्यांची महसुलमंत्री बाळासाहेब थोरात आणि महसुल आयुक्तांसोबत बैठक झाली. त्यातच आंदोलनामुळे शेतकरी व अन्य लोकांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्याचा विचार करुन तलाठी संघाने तुर्तास आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांनी दिली. तसेच येत्या १५ दिवसाच्या आता संबंधित अधिकाऱ्याची बदली न केल्यास पुन्हा काम बंद आंदोलन सुरु करण्याचा इशाराही राज्य तलाठी संघाच्या वतीने देण्यात आला आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |