07:37pm | Mar 23, 2022 |
सातारा : मलकापूर हद्दीत महामार्गावर असलेल्या महामर्गावरील ग्रीनलॅन्ड हाॅटेलमध्ये युवक- युवतींना एकत्र करून रंगपंचमीनिमित्त आयोजित केलेला रंग बरसे कार्यक्रम पोलिसांनी उधळला. कोणतीही परवानगी न घेता ग्रीनलॅन्ड या हॉटेलमध्ये कार्यक्रम होणार होता. कार्यक्रमापूर्वीच जमलेल्या युवक, युवतींना पोलिसांनी हकलले, मात्र आयोजक किंवा हाॅटेलवर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.
रंगपंचमीच्या दिवशी ग्रीनलॅन्ड हॉटेलमध्ये रंग बरसे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये सहभागी होण्यासाठी आयोजकांकडून ऑनलाईन व प्रत्यक्ष तिकिटांची विक्री करण्यात आली होती. त्यासाठी ऑनलाईन बुकिंग घेणाऱ्यांना 350 रूपये व कार्यक्रमावेळी प्रत्यक्ष येणाऱ्यांना 500 रुपयाला तिकीट दिले जाणार होते. यासाठी आठवडाभरापासून ऑनलाईन बुकिंग सुरू होते. रंगपंचमी दिवशी हायवेलगत असलेल्या या हॉटेलच्या परिसरात युवक-युवतींची मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर यांना माहिती घेण्यास सांगितले. अमित बाबर यांनी माहिती घेतली असता संबंधित हॉटेलमध्ये रंग बरसे कार्यक्रम होणार असल्याचे व त्यासाठी युवक युवती जमा होत असल्याचे त्यांना समजले. दरम्यान या कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याने पोलिसांनी हा कार्यक्रम सुरू न करण्याच्या सुचना आयोजकांना दिल्या. यावेळी आयोजकांनी आयत्या वेळेला पोलिसांकडे परवान्याची मागणी केली. परंतु पोलिसांनी तो परवाना देण्यास नकार दिला.
पोलिसांनी हॉटेलच्या गेटवरच थांबून येणाऱ्या युवक-युवतींना तेथून हाकलून लावले. तेथे थांबल्यास कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला. याबाबतची सूचना पोलिस जीप वरील लाऊड स्पीकर वरून पोलिसांनी वारंवार दिली. तरीही दुपारी साडेतीन वाजेपर्यंत अनेक युवक युवती जमावाने हॉटेलच्या परिसरात रेंगाळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांनाही तेथून पांगवले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पोलीस हॉटेलच्या गेटवर पोहोचले होते. त्यानंतर साडेतीन ते चार वाजेपर्यंत पोलीस फौजफाटा हॉटेलच्या परिसरात येणाऱ्या युवक-युवतींना परत जाण्याच्या सूचना करत होता. अशाप्रकारे कोणतीही परवानगी न घेता हॉटेलमध्ये आयोजित केलेला रंग बरसे कार्यक्रम पोलिसांनी उधळून लावला.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |