01:12pm | Sep 09, 2020 |
पुसेगाव: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून कोरेगाव व दहिवडी बाजूने सातारा-सोलापूर राज्यमार्गाच्या काँक्रीटीकरणाची कामे पूर्ण होत आली आहेत. पुसेगावमधून जाणारा हा मार्ग श्री सेवागिरी महाराजांच्या रथोत्सवाचा मार्ग आहे. गावातून जाणार्या या रथमार्गाच्या कामाला अद्याप सुरुवात झालेले नाही. गेली दोन वर्षे श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रा कालावधीत ठेकेदारांकडून रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी फक्त गडबड करण्यात आली. पण यात्रा संपल्यानंतर सात आठ महिने उलटूनही रस्त्याच्या कामाबाबत काहीही हालचाली नाहीत. सध्या कोरोना कालावधीत गावातील वाहतूक कमी आहे. बाजारपेठेत फारशी वर्दळ नाही. अशा स्थितीत या रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामास लवकरात लवकर सुरुवात करावी. तत्पुर्वी गावातील दोन्ही पुलांची कामेही तातडीने सुरु होणे आवश्यक असल्याची चर्चा ग्रामस्थ करत आहेत.
कोरेगाव-पुसेगाव व दहिवडी-पुसेगाव दरम्यान रस्त्याच्या काँक्रीटीकरणाची कामे पूर्ण झाली असली तरी काही कामे अत्यंत सावकाश सुरु आहेत. अनेक ठिकाणी पुलाची कामे अपूर्ण आहेत. वर्धनगड घाटातील पुलांच्या कामांना प्रारंभ झाला आहे. पुसेगावमधीन जाणार्या रथमार्गावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे होते. पण ऐन पावसाळ्यात खड्ड्यांवर मारलेले डांबराचे पॅचही गेल्या आठवड्यातील पावसामुळे उखडले आहेत. या रस्त्याचे काँक्रीटीकरण होणार असल्याने अनेकदा तात्पुरती डागडूजी केलेल्या या रस्त्यावर पुन्हा नव्याने खड्डे पडून वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. गेल्या दोन वर्षात श्री सेवागिरी महाराजांच्या दोन यात्रा पार पडल्या. यात्रा जवळ आली की ठेकेदार रस्त्याच्या कामाची गडबड करतात.
श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टबरोबर मिटींगाही घेण्यात आल्या. यात्रा पार पडल्यावर काम सुरु करण्याचा निर्णयही झाला. पण यात्रा संपल्यानंतर सात आठ महिने होऊनही रस्त्याच्या कामांबाबत हालचाली नाहीत. केवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूना खांब रोवून रस्ता मोजणीचा फार्स करण्यात आला आहे. पण गावातील रस्त्याची दुरवस्था पाहता या रथमार्गाचे काम त्वरीत सुरु होणे आवश्यक असल्याचे श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी सांगितले. सध्या कोरोना कालावधीत गावामधून वाहतून कमी असून बाजारपेठेतील वर्दळही कमी आहे. अशावेळेस रथमार्गाच्या कामास प्रारंभ होणे आवश्यक आहे. तत्पुर्वी गावातून जाणार्या रस्त्यावरील दोन्ही पुलांच्या कामांनाही प्रारंभ होणे आवश्यक आहे. यावर्षी झालेल्या पुरेशा पावसामुळे पाणीही मुबलकप्रमाणात आहे. पावसामुळे जमीन खोलवर ओलसर असून खोदकामामुळे रस्त्यालगतच्या व्यावसायिकांना व रहिवाशांना धुरळ्याचा त्रास होणार नाही.
वाहनांची वर्दळ कमी असल्याने कामातही अडथळा होणार नाही. तसेच व्यावसायिकांनाही आर्थिक नुकसानीची भिती राहणार नाही. कोरोनाच्या कालावधीत अनेक सण व उत्सवांना प्रशासनाने बंदी घातली. तीन चार महिन्यानंतर या वर्षीच्या रथोत्सवाला जर परवानगी मिळाली तर त्यावेळी रथमार्गही सुस्थितीत असेल. कोरोनामुळे विस्कळीत झालेली परिस्थीतीवर पुर्वपदावर आल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याऐवजी सद्यस्थितीत काम सुरु व्हावे, या सर्व बाबींचा विचार करुन श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट, पुसेगाव ग्रामपंचायत व लोकप्रतिनीधींनी रथमार्गाच्या काँक्रीटीकरण कामा त्वरीत सुरु व्हावे यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |