सातारा : भारतीय जनता पार्टी, महिला मोर्चा सातारा शहर तर्फे आज दि ७ जुलै रोजी पोवई नाका सातारा येथे सीमेवर शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी चीनचा निषेध करण्यात आला.
या वेळी भारत माता की जय, चिनी वस्तूवर बहिष्कार स्वदेशीचा अंगीकार, वंदे मातरम, लाल गुलामी छोड के बोलो -बोलो वंदे मातरम,
या घोषणा देण्यात आल्या. भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. कविताताई कचरे, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, सौ सुवर्णाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात महिला मोर्चा अध्यक्ष रिना भणगे, सातारा शहर मनीषा पांडे, चिटणीस वैशाली टंकसाळे, नजमा बागवान, माजी अध्यक्ष निर्मलाताई पाटील, माजी तालुका अध्यक्ष स्मिता निकम, कुंजबाला खंदारे, अंजली कन्नूर, हेमांगी जोशी, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
दरम्यान, भारत तिब्बत सहयोग मंच महिला विभाग जिल्हाध्यक्षा सौ.मनिषा पांडे व सर्व पदाधिकारी यांच्या सहयोगाने शिवतीर्थ पोवईनाका सातारा येथे गलवान खोऱ्यातील चीनच्या भ्याड हल्लात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली व चीनचा जाहीर निषेध तसेच चीनी मालावर बहिष्कार करण्यासाठी निषेध आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी चीनच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या तसेच सोशल डिंस्टसिंगचे पालन करुन स्वदेशीच्या अंगीकाराचे फलक हाती घेऊन सर्व पदाधिकाऱ्यांनी जय भारत जय तिब्बतच्या व वंदेमातरमच्या घोषणा दिल्या. तसेच सौ मनिषा पांडे यांनी माता, भगिनी सर्व महीलांना येणाऱ्या ऱक्षाबंधनाच्या पवित्र सणाला आपण सर्वांनी फक्त आणि फक्त स्वदेशी राख्या खरेदी कराव्यात, अशी विनंती केली. हिच आपल्या तर्फे वीर जवानांना खरी श्रद्धांजली असेल असे मतही व्यक्त केले. या कार्यक्रमास भारत तिब्बत सहयोग मंचाच्या महामंत्री सौ वैशाली टंकासाळे, सौ कुंजबाला खंदारे, उपाध्यक्षा हेमांगी जोशी, सौ अंजली कन्नुर, सौ. स्मिता निकम, सौ. वंदना लाड, सौ. ममता जोशी उपस्थित होत्या.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |