पुसेगाव : खटाव परिसरात बुधवारी रात्री अचानक हजेरी लावलेल्या पावसात हुसेनपूर शिवारात रामचंद्र चव्हाण या मेंढपाळाची पावसात गारठून ४० मेंढ्या तसेच राजापूर येथील चार मेंढपाळ्यांच्या १२ मेंढ्या व एक कोकरू ठार झाल्याने संपूर्ण मेंढपाळाच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लोणी (ता. खटाव ) येथील श्रीमंत शिंदे यांच्या हुसेनपूर येथील शेतात रामचंद्र चव्हाण व त्यांच्या मावस भाऊ यांनी गेली सहा दिवस कराराने मेंढरे बसवली होती. काल अचानक रात्रीच्या वेळी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने मेंढ्या सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यासाठी त्यांची तारांबळ उडाली. मात्र अंधार पडला असल्याने व चिखल झाल्याने त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहचा न आल्याने, परिणामी ४० मेंढरे गारठून ठार झाली तर काही अत्यवस्थ स्थितीत आहेत. एकदम ४० मेंढ्या दगवल्याने चव्हाण कुटुंबियांवर आकाश कोसळले आहे. शासनाने या घटनेची माहिती घेऊन त्वरित पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.
दूसऱ्या घटनेत : राजापूर, ता. खटाव येथे गरतोंडी शिवारामध्ये शेतात बसण्यास असणार्या दिडशे मेंढ्यापैकी १२ मेंढ्या व एक कोकरू थंडी व अतिवष्टीमुळे मृत्यू पावल्या. मेंढपाळ सर्जिराव संपत मदने, गणपत रामा मदने, चंद्रकांत बबन मदने व जालिंदर अशोक मदने यांच्या मालकीच्या होत्या. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता लोखंडे, डॉ. विश्वास इनामदार व तलाठी प्रितम पडवड यांनी याठिकाणी जाऊन यांनी झालेत्या नुकसानीचा पंचनामा केला.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |