12:33pm | Jun 13, 2022 |
दिल्ली : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी शनिवारी जगाला रशियन हमले थांबविण्याचे आवाहन केले. रशियन हमल्याचा केवळ युक्रेनवरच परिणाम होत नसून संपूर्ण जगावर परिणाम होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचाही आगामी काळात गंभीर परिणाम होणार आहे. युक्रेनवरील या हमल्यामुळे जगाची व्यवस्था बिघडणार असल्याचे झेलेन्स्की यांनी सांगितले. सिंगापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी जगाला हा इशारा दिला.
झेलेन्स्की म्हणाले, की 100 दिवसांच्या लढाईत युक्रेनला ज्या प्रकारे साथ दिली त्याबद्दल सर्वांचे आभारी आहोत. काळा समुद्र आणि आणखी एका समुद्रावर रशियाचा ताबा केवळ युक्रेनवरच नाही तर संपूर्ण जगाला प्रभावित करत आहे, असे ते म्हणाले. यामुळे जागतिक बाजारपेठेत पोहोचणारा गहू, मका आणि इतर अन्नधान्यांचा पुरवठा थांबला आहे. याचा फटका अन्नसंकट आणि वाढत्या महागाईच्या स्वरूपात येऊ शकतो. त्यामुळे गुन्हेगारी वाढून अस्थिरता निर्माण होऊ शकते.
झेलेन्स्की म्हणाले, की त्यांच्या सैन्याला रशियन भूमीवर युद्ध करण्याची अजिबात इच्छा नाही. युक्रेनियन सैन्य आपली जमीन आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी लढत आहे. यात त्याला संपूर्ण जगाचे सहकार्य आणि सदिच्छा अपेक्षित आहे. युक्रेनचे संकट वेळीच सोडवले नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, असा इशाराही नुकताच जागतिक बँकेने जगाला दिला होता.
युद्ध थांबविण्याचे प्रयत्नही सुरू
जागतिक बँकेचे अध्यक्षांनी सांगितले की, या युद्धाचे परिणाम दिसू लागले आहेत, जगाच्या अनेक भागांमध्ये अन्न पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने त्याच्या किंमती प्रचंड वाढताना दिसत आहेत. दरम्यान, या दोन्ही देशांतील युद्ध अजूनही मिटलेले नाही. या युद्धामुळे रशिया आणि युक्रेनच नाही तर जगाचेही मोठे नुकसान झाले. अनेक गरीब आणि विकसनशील देशांना याचा मोठा फटका बसला आहे. युद्ध थांबविण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. मात्र, या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. जागतिक पातळीवर या युद्धाचे परिणाम आता स्पष्टपणे दिसत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |