12:54pm | Jul 04, 2022 |
मुंबई : एकनाथ शिंदे आणि भाजपने एकत्र येत स्थापन केलेल्या सरकारने सोमवारी विधानसभेत बहुमताचा ठराव १६४ विरुद्ध ९९ अशा मतांच्या फरकाने जिंकला. शिंदे-फडणवीस सरकारने बहुमताचा ठराव जिंकल्यानंतर मांडण्यात आलेल्या अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेत बोलण्यासाठी सर्वप्रथम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे राहिले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला आपल्या सरकाराचा उल्लेख जाणीवपूर्वक 'शिवसेना-भाजप' सरकार असा केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत प्रस्तावावरील मतदानाला गैरहजर राहणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आभार मानले. ज्या सदस्यांनी या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं, त्यांचे आभार मानतोच, शिवाय अप्रत्यक्षपणे हा प्रस्ताव प्रचंड मताने पारित व्हावा यासाठी बाहेर राहून मदत केली त्यांचेही आभार, त्या 'अदृश्य' हातांचेही मनापासून आभार, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
बहुमत प्रस्तावावर मतदान झाले तेव्हा सभागृहाच्या प्रथेप्रमाणे सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात आले. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार उशीरा आल्याने त्यांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला. यापैकी काही आमदारांना दरवाजे बंद असल्याने सभागृहाबाहेर ताटकळत उभे राहावे लागले. यामध्ये अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, संग्राम जगताप, अण्णा बनसोडे, निलेश लंके, शिरीष चौधरी, धीरज देशमुख, झिशान सिद्दिकी यांचा समावेश होता. शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव हेदेखील अगदी शेवटच्या क्षणी धावतधावत सभागृहात दाखल झाले. अनेक आमदार बहुमत प्रस्तावावरील मतदानाला गैरहजर असल्याने सभागृहातील महाविकास आघाडीच्या मतांची संख्याही कमी झाली. काल विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने १०७ मते होती. मात्र, आज बहुमत प्रस्तावाविरोधात मतदान करणाऱ्या महाविकास आघाडीच्या आमदारांची संख्या ९९ इतकीच होती.
शिवसेना आमदारांकडून 'ईडी-ईडी'चा गजर
शिंदे-फडणवीस सरकार सोमवारी विधानसभेत बहुमत प्रस्तावाला सामोरे गेले. बहुमत प्रस्तावावर मतदान सुरु असताना शिवसेनेकडून पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर निशाणा साधण्यात आला. काल विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान सुरु असताना यामिनी जाधव आपला क्रमांक उच्चारण्यासाठी जागेवर उभ्या राहिल्या तेव्हा शिवसेना आमदारांकडून 'ईडी-ईडी'चा गजर करण्यात आला होता. आज ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक मतदानासाठी आपल्या जागेवर उभे राहिले तेव्हादेखील शिवसेना आमदारांकडून त्यांना 'ईडी-ईडी' चिडवण्यात आले. तेव्हा प्रताप सरनाईक यांनी शांत न राहता तात्काळ शिवसेना आमदारांना प्रत्युत्तर दिले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांच्या दिशेने बघत 'तुम्हाला अर्ध्या तासात प्रत्युत्तर देतो' असे म्हटले.
तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सोहम भोईटे प्रथम |
शिंगणापूर रोडवर ट्रीपल सीट दोन दुचाकीची समोरासमोर भीषण धडक |
‘शिवसंग्राम’चे विनायक मेटे यांचे अपघातात निधन |
राकेश झुनझुनवाला यांचं निधन, शेअर मार्केटमधील बादशाह गेला! |
भटक्या विमुक्त जमाती संघटना दि. १५ ऑगस्ट रोजी काढणार झेंडा रॅली |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यांवर छापे |
दोन वेगवेगळ्या दारू अड्डयांवर छापे |
फलटण येथील जयवंत नगर परिसरात घरफोडी |
शेडमधून ३० हजार रुपये किंमतीच्या प्लेटा चोरीस |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकींची चोरी |
कंटेनर-इरटीका कार अपघातात तीनजण जखमी |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातात नुकसान केल्या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने दोन जण ठार; दोन महिला गंभीर |
नातवाने केला आजीचा डोक्यात दगड घालून खून |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यांवर छापे |
दोन वेगवेगळ्या दारू अड्डयांवर छापे |
फलटण येथील जयवंत नगर परिसरात घरफोडी |
शेडमधून ३० हजार रुपये किंमतीच्या प्लेटा चोरीस |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकींची चोरी |
कंटेनर-इरटीका कार अपघातात तीनजण जखमी |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातात नुकसान केल्या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने दोन जण ठार; दोन महिला गंभीर |
नातवाने केला आजीचा डोक्यात दगड घालून खून |
सातारा येथे वीर पत्नींचा सन्मान |
सातारा जिल्हा बँकेचा सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून सन्मानपूर्वक सत्कार! |
महाराष्ट्रात विकास कामांसाठी अठरा हजार कोटी रुपयांची मागणी : शंभूराज देसाई |
सातारा येथे केंद्रीय विद्यालयाची खा. उदयनराजे यांची मागणी |
औषध निर्माण क्षेत्रात संशोधनात्मक मनुष्यबळाची नितांत गरज |