सातारा : बोगस सैन्य भरती प्रकरणातील संशयित आरोपी आकाश डांगेला मदत केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी साहील झारी याला निलंबित केले असून शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर तसेच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक उस्मान शेख याला सातारा पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी या प्रकरणातील भ्रष्ट कर्मचार्यासह अधिकार्यांना तेजस्वी धक्का दिल्यामुळे सातारा पोलीस दलाची जनमानसातील प्रतिमा अधिक तेजस्वी झाली आहे. भारतीय सैन्य दल तसेच नौदलामध्ये भरतीचे आमिष दाखवून भाडळी बु॥ ता. फलटण येथील आकाश काशिनाथ डांगे, तसेच बारामती, जि. पुणे येथील नितीन जाधव यांनी राज्यातील शेकडो युवकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला होता. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस हद्दीमध्ये या दोघांविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते. गेल्या चार महिन्यांपासून फलटण तसेच बारामती तालुक्यामध्ये बोगस सैन्य भरती रॅकेटच्या विरोधात ‘सातारा टुडे’ने सडेतोड वार्तांकन केले होते. ‘सातारा टुडे’च्या सातत्याने होत असलेल्या रॅपिड वार्तांकनामुळे डांगे तसेच जाधवने फसवणूक केलेल्या युवकांमध्ये जागृती निर्माण झाली होती. याचाच परिपाक म्हणून 19 जून रोजी आकाश डांगे व बारामती येथील नितीन जाधव या द्वयींच्याविरोधात भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना या प्रकरणाची दाहकता लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी तत्काळ आकाश डांगे व नितीन जाधवच्या मुसक्या आवळण्याचे आदेश पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानंतर एलसीबीचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी आकाश डांगे व नितीन जाधवच्या मुसक्या आवळल्या होत्या. पोलीस तपासामध्ये आकाश व नितीनला फलटण शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर तसेच पोलीस शिपाई साहील झारी व फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख यांनी मदत केल्याचे निदर्शनास आले होते. आकाश डांगेला फलटण शहर-ग्रामीण पोलीस ठाण्यातील वरील अधिकार्यांनी केवळ पैशाच्या लोभापोटी मदत केली होती. भारतीय सैन्य व नौदलामध्ये आकाश व नितीन हे केवळ पैशांच्या लालसेपोटी महाराष्ट्रातील युवकांना भरती करण्याचे आमिष दाखवून फसवणूक करीत आहेत, हे माहिती असूनसुद्धा वरील तिघांनी आकाश डांगेला कायद्याचे उल्लंघन करुन मदत केली. देशाच्या सुरक्षेशी खेळणार्या या तिघांनाही आपण पोलीस दलात कार्यरत आहोत, याचे भानही उरले नाही. परंतू आकाश डांगे व नितीन जाधव यांनी केलेल्या देश विघातक कांडाचा घडा फुटला. त्यामुळे पुणे पोलिसांनी या प्रकरणातील गांभीर्यता ओळखून या दोघांच्याही मुसक्या आवळल्या. शेवटी पुणे पोलिसांच्या धाडसामुळे देशातील सैन्य भरती घोटाळा उघडकीस आला. गेल्या काही वर्षांपासून आकाश डांगेने महाराष्ट्रात सैन्य भरतीचा बाजार केला. राज्यभरातील अनेक नौजवान सैन्य भरतीच्या आमिषापोटी फलटणमध्ये येवू लागले. सैन्य भरतीचे आमिष दाखवून आकाश डांगेने शेकडो युवकांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी फलटण शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात आकाश डांगेच्या विरोधात अनेक तक्रारअर्ज आले होते. परंतू बनकर, शेख व झारीने या तक्रारअर्जांची पोलीस ठाण्याच्या बाहेरच विल्हेवाट लावून आकाश डांगेची चोरीची मोरी उचलण्याचे काम केले होते. जानेवारी महिन्यातच आकाश डांगेचा खास पंटर सचिन डांगेवर गुन्हा दाखल झाला होता. तपासात आकाश डांगेचे नावही समोर आले होते. परंतू तत्कालीन तपासाधिकार्यावरच आकाश डांगे व टीमने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ट्रॅप लावून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला होता. अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी आकाश डांगे प्रकरणाचा पर्दाफाश करुन त्याला जेलची हवा खायला लावलीच. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने आकाश डांगे व नितीन जाधवला जामीन दिला असला तरी सातारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आपले कर्तव्य चोख बजावले असून बोगस सैन्य भरती प्रकरणात आकाश डांगेला मदत करणार्या फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर, ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख यांची उचलबांगडी मुख्यालयात केली असून फलटण शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी साहील झारी याला निलंबित करण्यात आले आहे. या तिघांवरही कारवाई केवळ ‘सातारा टुडे’च्या दणक्यानेच झाली आहे, अशी चर्चा फलटणसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात आहे.
सातपुतेंची ‘तेजस्वी’ कारवाई
फलटण येथील सैन्य व नौदलातील बोगस भरतीप्रकरणी फलटण तालुका वादाच्या भोवर्यात सापडला होता. फलटणमधील सैन्यभरतीपूर्व प्रशिक्षण संस्था (ऍकेडमी) या गेल्या अनेक वर्षापासून सैन्य दलात अनेक नवोदित युवकांना भरतीचे आमिष दाखवून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक करीत होत्या. सैन्य दलातील परीक्षेच्या पेपर फुटीप्रकरणी भारतीय सैन्य दलाने यापूर्वी तालुक्यात कारवाई केली होती. याच भानगडबाज संस्थांच्या नादाला लागून आकाश डांगेने फलटण तालुक्यात सैन्य भरतीचा बाजार भरवला होता. याच माध्यमातून त्याने राज्यभरातील अनेक तरुणांना सैन्य भरतीचे आमिष दाखवून त्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली होती. आकाश डांगेने केलेल्या भानगडींची सातारा टुडे ला माहिती मिळाल्यानंतर सातारा टुडे ने सडेतोड वार्तांकन करुन आकाश डांगेवर कारवाई करण्याची मागणी केली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी आकाश डांगेसह नितीन जाधव वर कारवाई केल्यानंतर त्यांना मदत करणार्या फलटण पोलिसांमधील दोन उपनिरीक्षकांसह कर्मचार्यावर कारवाईचीही मागणी केली होती. त्यानंतर सातारा जिल्ह्याच्या कार्यतत्पर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेवून भ्रष्ट पोलीस अधिकारी बनकर, शेख यांची तडकाफडकी मुख्यालयात बदली केली असून पोलीस शिपाई साहील झारी याला निलंबित करुन तेजस्वी कारवाई केली आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |