02:47pm | Aug 23, 2020 |
वाई: सेल्फीच्या मोहापायी एका युवकाला आपले प्राण गमवावे लागल्याची दुर्घटना बलकवडी धरणावर घडली. शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत पसरणी येथील 22 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.
याबाबत समजलेली सविस्तर माहिती अशी की, पसरणी (ता. वाई) येथील अजय विजय महांगडे (वय 22) व त्याचे मित्र बलकवडी धरणावर फिरायला गेले होते. बलकवडी धरण परिसरात हे युवक सेल्फी घेत असताना धरणावरील सिक्युरिटी गार्ड जेवायला गेला होता. हे युवक सांडव्याच्या नजीक सेल्फी घेण्यासाठी गेले होते. दरम्यान निसरड्या जागेवरून पाय घसरल्याने अजय महांगडे सांडव्यावरून खाली पडला. यावेळी सांडव्यातून पाण्याचा विसर्ग ही सुरू होता. पडल्यानंतर अजयच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. सांडव्यातील पाणी पूर्णपणे बंद करून स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने रोप व ट्यूबच्या मदतीने त्याचा मृतदेह सायंकाळी सहाच्या सुमारास सांडव्यातून बाहेर काढण्यात आला.
दरम्यान सुस्वभावी असलेल्या अजयचा मित्र परिवार मोठा आहे. अजय प्लंबिंगची कामे करत होता. अजयच्या पश्चात आई, वडील, विवाहित बहीण एक भाऊ असा परिवार आहे. या घटनेची माहिती परिसरात मिळताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |