09:01pm | May 26, 2023 |
सातारा : बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड करण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत 1 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संशयित रिक्षा चालकासह दोन महिलांना अटक करण्यात आली आहे.
बजरंग यशवंत काळे वय 33 (रिक्षाचालक) रा.काळे वस्ती, यश ढाब्याचेमागे कोंडवे ता.जिल्हा-सातारा, सोमावती विजय घाडगे वय 30 रा.गोसावीवस्ती, सैदापुर ता.जिल्हा-सातारा आणि पुनम मुकेश जाधव वय 25 रा.गोसावीवस्ती, सैदापुर ता.जिल्हा-सातारा अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील मंगळवारपेठ ढोणे कॉलनी येथील नगरसेवक रविंद्र ढोणे यांच्या बंगल्याच्या बांधकाम साईटवरील लोखंडी साहित्याची अनोळखी महीलांनी चोरी करुन साहित्य रिक्षातुन घेवुन गेल्याबाबत विजय रमेश देशमुख रा.चिमणपुरापेठ सातारा यांच्या फिर्यादीवरुन दि.20 मे रोजी शाहुपूरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शाहुपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक या गुन्हयाचा तपास करत होते. पथकाने घटनास्थळी भेट देवुन त्याठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले होते व गुन्हयात वापर झालेल्या रिक्षाबाबत माहीती प्राप्त केली होती. दरम्यान शाहुपुरी पोलीस ठाण्याचे पो.हे.कॉ. डमकले हे दि. 25 मे रोजी रात्रपाळी कर्तव्यावर असतांना पहाटेचे सुमारास त्यांना एका रिक्षामध्ये दोन महिला संशयितरित्या फिरतांना आढळुन आल्या. त्यामुळे त्यांनी ती रिक्षा व त्यामधील दोन संशयित महिलांसह रिक्षाचालक यांना पोलीस ठाण्यास आणले. संशयित रिक्षाचालक व त्या दोन महिलांकडे शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने कौशल्याने विचारपुस करुन तपास केला असता त्यांनी ढोणे कॉलनीतील बांधकामावरील लोखंडी साहित्याची चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडुन गुन्हयातील चोरुन नेलेले बांधकाम साईटवरील लोखंडी रिंगा, लोखंडी बार असे साहीत्य तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली रिक्षा व मोबाईल हॅन्डसेट असा एकुण 1 लाख 35 हजार रु.किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्हयातील रिक्षाचालक आरोपी व दोन महिला या रेकॉडवरील सराईत चोर असल्याचे व त्यांच्यावर यापुर्वी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहीती प्राप्त झाली आहे. या गुन्हयाचा अधिक तपास पो.हे.कॉ. हसन तडवी करत आहेत.
अशा प्रकारे शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने बांधकाम साईटवरील साहीत्याचे चोरीचा गुन्हा उघडकीस आणुन गुन्हयातील रिक्षाचालक आरोपी व दोन महीलांकडुन लोखंडी रिंगा, लोखंडी बार असे साहीत्य तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली रिक्षा व मोबाईल हॅन्डसेट असा एकुण 1 लाख 35 हजार रु.किं.चा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक़ समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापु बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पतंगे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो.हेड.कॉ. हसन तडवी, लैलेश फडतरे, तुषार डमकले, पो.ना.अमीत माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, पो.कॉ.सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, चालक शशिकांत नलवडे यांनी केली आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर |
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर |
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीसाठी रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण |
केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर |
साताऱ्यात ८ रोजी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा मेळावा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या |
मोटर सायकल वरून पडून एकाचा मृत्यू |
सातारा शहरातील 61 जणांवर तडीपारीची कारवाई |
इलेक्ट्रिक मोटार चोरणारी टोळी सातारा जिल्ह्यातून तडीपार |
नमस्कार सातारकर, हे आहे हिंदवी 89.6... |