सातारा : सातारा नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी भाजपाचे पदाधिकारी सुनील काळेकर यांची आज बिनविरोध निवड झाली. काळेकर हे सहा महिन्यासाठी स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करतील. तद्नंतर जयदीप ठुसे यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लावली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
2016 साली झालेल्या सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने सहा जागांवर विजय मिळवला होता. भाजपाच्या वाटणीला एक स्वीकृत नगरसेवकपद आले होते. त्यानंतर भाजपाने प्रशांत खामकर, सागर पावशे, विकास गोसावी यांना या पदावर काम करण्याची संधी दिली होती. विकास गोसावी यांचा कार्यकाल समाप्त झाल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला होता. सातारा नगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. भाजपाकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी मंगळवारी सुनील काळेकर यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता. आज मंगळवारी दुपारी तीन वाजल्यानंतर मिनाज मुल्ला यांनी सुनील काळेकर यांची स्वीकृत नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. यापूर्वी झालेल्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडणूक सुनील काळेकर यांना डावलण्यात आले होते. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक पदावर त्यांचीच वर्णी लावली जाईल अशी चर्चा होती. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार सुनील काळेकर यांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी हे पद देण्यात आले असून तदनंतर जयदीप ठुसे यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पीठासीन अधिकारी म्हणून मिनाज मुल्ला यांनी कामकाज पाहिले. यावेळी धनंजय जांभळे, विकास गोसावी, प्राची शहाणे, आशा पंडित, मिलिंद काकडे, विठ्ठल बलशेठवार, प्रशांत खामकर, प्रवीण शहाणे उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी हा शिस्तप्रिय पक्ष आहे. साताऱ्यातील पक्ष वाढीची दखल जिल्हा आणि प्रदेश पातळीवर घेतली गेली आहे. सातारा शहर भाजपा पूर्णपणे एकसंघ आहे. सुनील काळेकर यांच्या निवडीचे सर्वांनीच मनापासून स्वागत केले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा आणि जिल्हाध्यक्ष विक्रमजी पावसकर यांनी विचारपूर्वक निर्णय घेतला आहे ,
कोणीही नाराज होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, इच्छुक सुद्धा पक्ष कार्यात सक्रिय आहेत ,सगळेच कार्यक्रम आंदोलने पहिल्या सारखीच चांगल्या प्रकारे होतील आणि पक्ष संघटना वाढत राहील
- विकास विजय गोसावी,
शहराध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, सातारा.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |