01:30pm | Jan 11, 2022 |
कराड : सध्या, राज्यासह जिल्ह्यातही कोरोना पॉझिटिव्ह रेट वाढत चालल्याची आकडेवारी समोर येत आहे. कराड तालुक्यातही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी-जास्त होत असून कराडचे तहसीलदार विजय पवार यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे तहसील कार्यालयात खळबळ उडाली असून कार्यालयातील सर्व कर्मचार्यांची कोरोना टेस्ट सूरू करण्यात आली आहे.
तहसीलदारांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने नगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने आज मंगळवारी 11 रोजी तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यास सुरुवात केली आहे. तसेच कराड, मलकापूरसह तालुक्यात वाढत्या कोरोना पॉझिटिव्ह रेटच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध लावले असून नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचनाही नगरपालिका, पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, तहसीलदार विजय पवार यांचा सोमवारी 10 रोजी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांनी तात्काळ उपचार सुरू केले आहेत. तसेच तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कोरोना टेस्ट करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर तालुक्यातील नागरिकांनीही कोरोना नियमांचे व प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करावे, आरोग्याबाबत थोडी जरी शंका आल्यास संबंधितांनी तात्काळ आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही तहसीलदार विजय पवार यांनी केले आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |