12:04pm | Jun 24, 2020 |
बीजिंग: चीनी सुधारायचे नाव घ्यायला तयार नाहीत. चीनच्या वागण्यात आणि बोलण्यात नेहमीप्रमाणे फरक दिसू लागला आहे. लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर झालेला तणाव निवळण्यासाठी सैन्य मागे घेणार असल्याचे चीनने म्हटले होते. मात्र, चीनच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक असल्याचे याआधीही दिसून आले आहे. आता पु्न्हा एकदा हीच परिस्थिती असल्याचे दिसून आले आहे. पँगोंग त्सो तलावाजवळ चीनने आपली कुमक वाढवली असल्याचे समोर आले आहे.
ओपन सोर्स इंटेलिजेंस अॅनालिस्ट Detresfa ने नवीन सॅटेलाइट इमेज जारी केले आहेत. या सॅटेलाइट इमेजनुसार, चीनची पीपल्स लीबरेशन आर्मीने पँगोंग त्सो तलाव परिसरात अजून ठाण मांडले आहे. इतकेच नव्हे तर हळूहळू चीनची सैन्य लहान गटांद्वारे वाढत आहे. पँगोंग त्सो तलावापासून दक्षिणेकडील भागात 19 किमी अंतरावर चीनची सैन्याची जमवाजमव दिसून आली आहे. एकदाच मोठ्या संख्येने येण्याऐवजी चिनी सैन्य लहान गट करून जमा होत आहेत. ही सैन्य वाढ जाणीवपूर्वक करण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला आहे.
भारत आणि चीनच्या लष्करी अधिकार्यांच्या चर्चेनंतर चीनने दोन्ही देशांमध्ये तणाव कमी करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहमती झाली असल्याचे म्हटले होते. मंगळवारी झालेल्या चर्चेत लडाखमध्ये तणाव कमी झाला असल्याचे चित्र होते.
दरम्यान. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील ताणावाच्या पार्श्वभूमीवर लेफ्टनंट जनरल स्तरावर चर्चा झाली. भारतीय पक्षाचे नेतृत्व 14व्या कोअरचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंह यांनी केले. तर, चीनी पक्षाचे नेतृत्व तिबेट मिलिटरी डिट्रिक्टचे कमांडरने केले. एलएसीवर दुसरीकडे चीनच्या भागात मोल्डो परिसरात दोन्ही सैन्याच्या अधिकार्यांदरम्यान बैठक झाली. ही बैठक सुमारे 12 तास चालली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी झालेल्या कोअर कमांडर स्तरावरील बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली. या बैठकीत दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्यावर सहमती झाली. तणाव असलेल्या क्षेत्रात दोन्ही पक्षांनी आपले सैन्य हटवण्यावर सहमती दर्शवली. पूर्व लडाखमधील ज्या-ज्या ठिकाणी समस्या आहे तेथे सैन्य कसे मागे घेतले जाणार यासंदर्भातील प्रक्रियेवर चर्चा झाली.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |