06:25pm | Jan 12, 2022 |
कराड : जेष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधताई संपकाळ यांच्या निधनाने समाजात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी तब्बल 1 हजार 500 अनाथ मुलांना मायेचा आधार दिला. तसेच माईंनी स्वतःच्या जीवनातील अनेक प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दैवी बुद्धिमत्तेच्या जोरावर एवढ्या मुलांचा सांभाळ केला. त्यामुळे त्या खऱ्या अर्थाने ‘अनाथांची माय’ ठरल्या. यातील बहुतांश मुलांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभे करून त्यांचे भविष्य घडवण्याचे अलौकिक कार्य केले असल्याचे प्रतिपादन बेलवडे बुद्रुकचे माजी सरपंच पांडुरंग मोहिते यांनी केले.
बेलवडे बुद्रुक, ता. कराड येथे ग्रामपंचायत कार्यालयात नुकतीच जेष्ठ समाजसेविका सिंधताई संपकाळ यांना ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विद्यमान सरपंच डॉ. सुशांत मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोहिते म्हणाले, जेष्ठ समाजसेविका सिंधताई संपकाळ यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशासह जगभरातही समाजसेवेचा एक आदर्श निर्माण केला आहे. अनाथांना आसरा देणे, तसे अवघड नाही. परंतु, त्यांचा सांभाळ करून त्यांच्या पालन-पोषणाचीही संपूर्ण जबाबदारी उचलणे, तसेच त्यांना नवी उभारी घेण्यासाठी त्यांच्या पंखात बळ निर्माण करण्याचे काम महाकठीण आहे. ते पेलण्याचे काम ‘अनाथांची माय’ बनून सिंधताई संपकाळ यांनी लीलया पार पाडले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरविल्याचे सांगत स्व. सिंधूताई सपकाळ यांनी बेलवडे बुद्रुक गावाला दिलेल्या भेटीच्या आठवणींनाही त्यांनी यावेळी उजाळा दिला.
दरम्यान, विद्यमान सरपंच डॉ. सुशांत मोहिते यांनी सर्व ग्रामस्थांच्या वतीने स्व. सिंधूताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी, विकास मोहिते, युवराज मोहिते, सुहास जाधव, दादासो मोहिते, वसंत मोहिते, नितीन मोहिते, जाफर पटेल, क्लार्क विजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |