09:14pm | Dec 18, 2021 |
पाटण : नाव, ता. पाटण गावातील काही गावकर्यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये सांबर या वन्य प्राण्यांची शिकार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी हेळवाक वन्यजीव विभागाने धडक कारवाई करत ५ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून मांस व अन्य मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सूनावली आहे.
दरम्यान, शिकारीतील योग्य वाटा न मिळाल्याने त्यांच्यातीलच एकाने वनजीव विभागाला सदर शिकारीची माहिती दिली. त्यामुळे सांबर शिकारीचा प्रकार समोर आला आहे. सीताराम शेंडे, विशाल पवार, अशोक विचारे, महेंद्र जगताप, आनंद विचारे (सर्व रा. नाव, ता. पाटण) अशी सांबराची शिकार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबतची माहिती अशी की, नाव, ता. पाटण गावातील काही गावकर्यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये सांबर या वन्य प्राण्यांची शिकार केली. शिकार केल्यानंतर नाव या गावात एका घरात सांबराचे मांस शिजवण्यात येत होते. याची गुप्त माहिती वन्यजीव विभागाच्या हेळवाक येथील कार्यालयात समजली. ही माहिती मिळताच वनक्षेत्रपाल संदीप जोपळे यांनी नाव गावात जाऊन छापा टाकला. या छाप्यात ५ जणांना मांस व अन्य मुद्देमालासह ताब्यात घेऊन अटक करण्यात आले. त्यानंतर त्यांना पाटण न्यायालयत हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सूनावली आहे.
‘स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स’च्या मंजुरीची गरज
काही दिवसांपूर्वी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये असलेल्या खाजगी जागेत अभ्यासासाठी लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये जंगलात कोअर भागात बंदूक व लाईट घेऊन जाणारे शिकारी कॅमेराबंद झाले होते. या लोकांची नाव उघड झाली आहेत. ते सर्रास शिकार करत असल्याचे स्थानिक लोक सांगतात. हे लोक हेळवाक, नेचल भागातील आहेत. अशाप्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला ‘STPF स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स’ तात्काळ मंजूर होणे गरजेचे आहे.
- रोहन भाटे (मानद वन्यजीव रक्षक तथा सदस्य वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो)
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |