फलटण : अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या गाडीला का अडवले, म्हणून गोरक्षकास मारहाण केल्याप्रकरणी 12 ते 13 जणाविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शरद गाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक 15 मार्च रोजी दुपारी 3.15 वा. चे सुमारास धुळदेव गावच्या हद्दीत नविन चालु असलेल्या पुलाच्या पुढे अमोल जाधव रा. मलटण ता. फलटण हे आले. काही वेळानंतर लाल रंगाची ओमनी कार समोरुन येताना दिसली म्हणुन आम्हाला त्या गाडीचा संशय आल्याने तीला थांबवुन गाडीमध्ये काय आहे ते पाहिले असता तीन देशी पांढऱ्या रंगाच्या गोवंशीय कालवडी (अंदाजे एक ते दीड वर्षे वयाचे) चारीही पाय व तोंड दोरीने बांधुन दाटीवाटीने गाडीत डांबुन ठेवले होते. त्यावेळी गाडीत काय आहे असे विचारत असताना पाठीमागुन एक पिकअप गाडी व पांढऱ्या रंगाची स्वीफ्ट गाडी नं MH-10 CA2876 आमच्या जवळ आली व स्वीफ्ट गाडीतुन अमिर मेहबुब मुलाणी रा. कोळकी हा आमच्या जवळ आला आणि ओमणी चालकाला म्हणाला की तु गाड़ी निकाल, आज मैं इनको देखता हूँ असे म्हणुन त्याचे कमरेला असलेला पिस्टल काढुन अमोल जाधव यांच्या डोकीला लावले. याचबरोबर स्वीफ्ट गाडीतुन इनायत कुरेशी, हुसेन बालाजी कुरेशी हातात लोखंडी गज घेवुन आले. वाहीद याकुब कुरेशी, आरबाज इम्तियाज कुरेशी हे हातात हॉकी स्टीक घेवुन आमच्या दिशेन पळत आले व मी पाठीमागे पिकअप मध्ये काय आहे हे पाहण्यासाठी जात असताना वरील लोकानी अमोल जाधव यांना लोखंडी गजाने व हॉकी स्टीक ने मारहाण करण्यास सुरवात केली. मी अमोल जाधव याला सोडवण्याकरीता त्यांच्या दिशेने येत असताना ओमनी गाडी व पिकअप गाडी अनोळखी चालकांनी तेथुन पळवून घेवुन गेले आहेत. त्याचवेळी पांढऱ्या रंगाची स्वीफ्ट गाडी नं. MH-14 BR 4569 गाडी आली. त्यामध्ये 6 मुस्लिम समाजाचे इसम होते. त्यापैंकी सद्दाम शौकत व्यापारी हा हातात लोखंडी कोयता घेवुन आमच्या दिशेने पळत आले व पुन्हा सर्वानी मिळुन अमोल जाधव यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा प्रकार जवळ राहणाऱ्या लोकांनी बघुन याठीकाणी जमा झाले. त्याचवेळी सौरव सुनिल सोनवले हा देखिल तेथे आला व त्यांनी सदरची भांडणे सोडवासोडव केली. यानंतर तेथुन ते सर्वजण पळुन निघुन गेले. त्यानंतर अमोल जाधव यांना घेवुन पोलीस स्टेशनला आलो. पोलीसांनी त्यांना औषध उपचाराची यादी दिल्यानंतर उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे उपचार घेवुन सध्या निकोप हॉस्पीटल फलटण येथे उपचार घेत आहेत.
आम्ही 15 मार्च रोजी दुपारी 3.15 वा. चे सुमारास धुळदेव ता. फलटण जि सातारा गावचे हद्दीत नविन चालु असलेल्या पुलाचे पुढे आसु बाजुकडुन फलटण बाजुकडे ऑमणी गाड़ी व पिकअप मधुन अवैद्य गोवंशीय जनावरांची वाहतुक होणार असल्याची माहीती मिळाल्याने सदर ठीकाणी मी व अमोल जाधव असे थांबलेलो असताना वरील वाहने आल्यानंतर त्यामध्ये गोवंशीय जनावरे असल्याने विचारपुस करीत असताना अमिर मेहबुब मुलाणी रा. कोळकी ता. फलटण जि सातारा याने तु गाडी निकाल आज मैं इनको देखता हूँ असे म्हणाला व त्याने आम्हाला शिवीगाळ केली तसेच त्याच्या कमरेला असलेले पिस्टल काढुन अमोल जाधव यांच्या डोकीला लावले. तसेच पांढऱ्या रंगाची स्वीफ्ट गाडी नं MH-10 CA2876 गाडीमधुन उतरुन इनायत कुरेशी, हुसेन बालाजी कुरेशी रा. कुरेशीनगर ता. फलटण जि सातारा हे हातात लोखंडी गज घेवुन आले आणि वाहीद याकुब कुरेशी, आरवाज इम्तियाज कुरेशी रा. कुरेशीनगर ता. फलटण जि सातारा यांनी हॉकी स्टीकने आम्हाला मारहाण केली. दरम्यान आणखी एका पांढऱ्या रंगाची स्वीफ्ट गाड़ी MH-14 BR 4569 मधुन 6 मुस्लिम समाजाचे इसम आले त्यातील सद्दाम शौकत व्यापारी याने लोखंडी कोयता घेवुन आमच्या दिशेने पळत आले व पुन्हा वरील सर्वानी मिळुन अमोल जाधव यांना लोखंडी गज, हॉकी स्टीक व लाथाबुक्यांनी मारहाण केली.
तसेच पिकअप गाडी व ओमणी गाडीवरील अनोळखी चालक गाडी घेवुन पळुन गेले आहे म्हणुन माझी त्यांच्याविरुद्ध तक्रार असल्याची फिर्याद शरद गाडे यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस अधिकारी करीत आहेत.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |