02:53pm | Jan 07, 2021 |
सिडनी: तिसर्या कसोटीतील पहिला दिवस कांगारूंचा ठरला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णय योग्य ठरवत त्यांनी पहिल्या दिवसावर वर्चस्व राखले. तिसर्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 2 बाद 166 धावा केल्या.
मार्नस लाबुशेन (67) आणि विल पुकोव्हस्की (62) यांनी ठोकलेल्या दमदार अर्धशतकी खेळीच्या बळावर पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियानं वर्चस्व राखलं आहे. दिवसाखेर लाबुशेन (67) आणि स्मिथ (30) नाबाद आहेत. भारतीय संघाकडून सिराज आणि सैनी यांना प्रत्येकी एक एक विकेट घेण्यात यश मिळालं. सात षटकानंतर पावसाचा व्यत्यय आल्यामुळे सामना थांबवण्यात आला होता. त्यामुळे पहिल्या दिवशी 55 षटकांचा सामना खेळवण्यात आला.
दुखापतीनंतर पुनरागमन करणार्या डेव्हिड वॉर्नरला सिराजनं पाच धावांवर माघारी धाडलं. त्यानंतर भारतीय संघ सामन्यात वरचढ होणार असं वाटलं होतं. मात्र, पदार्पण करणार्या पुकोव्हस्कीनं संयमी फलंदाजी केली. पुकोव्हस्कीला लाबुशेन यानं उत्तम साथ दिली. पुकोव्हस्की-लाबुशेन यांनी दुसर्या गड्यासाठी 100 धावांची भागिदारी केली. अखेर पदार्पण करणार्या सैनीनं पुकोव्हस्कीला पायचीत करत ही जोडी फोडली. पुकोव्हस्कीनं 62 धावांची खेळी केली.
स्मिथनं लाबुशेनबरोबर एकदिवसीय सामन्याप्रमाणे दोघांनी फटकेबाजी केली. पुकोव्हस्की बाद झाल्यानंतर लाबुशेन यानं सामन्याची सुत्रं आपल्याकडे घेतली. लाबुशेन यानं कारकीर्दीतील नववे अर्धशतकं झळकावलं. स्मिथनं त्याला चांगली साथ दिली. स्मिथ आणि लाबुशेन यांनी तिसर्या गड्यासाठी 60 धावांची नाबाद धावांची भागिदारी करत ऑस्ट्रेलियाची स्थिती आणखी मजबूत केली आहे. भारताकडून सिराज-सैनीचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला बळी घेण्यात यश आलं नाही. बुमराह, अश्विन आणि जाडेजाची पाटी दिवसाखेर कोरीच राहिली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |