(प्रकाश राजेघाटगे)
बुध: खटाव तालुक्यातील मांजरवाडी ते पुसेगाव मार्गालगत दुतर्फा राजपथ इन्फ्राकॉन कंपनीने मोठा गाजावाजा करता 7 हजार वृक्षांची लागवड केली खरा परंतु वृक्षारोपणाचा शो केल्यानंतर मात्र योग्य ती खबरदारी न घेतल्याने 50 टक्के झाडे मात्र पाण्याअभावी जळून गेली आहेत.
खटाव तालुक्यातील मांजरवाडी ते म्हासुर्णे मार्गाच्या रूंदीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मांजरवाडी ते पुसेगाव या रस्त्याच्या दोन्ही बाजूस वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला होता. राजपथ इन्फ्राकॉन कंपनीतर्फे खटाव तालुक्यात 35 हजार झाडे लावण्यात येणार असल्याची माहिती प्रोजेक्ट मॅनेजर सोमनाथ रूपनवर यांनी दिली होती. या कंपनीकडे रस्त्याचे काम आहे. त्यावेळी रस्याच्या दुतर्फा असलेली मोठी झाडे तोडण्यात आली होती. यामुळे उजाड झालेल्या या भागातल्या लोकांनी वृक्षतोडीबद्दल नाराजी व्यक केली होती. लोकांचा रोष राहू नये म्हणून या कंपनीने 7 हजार झाडांची लागवड दुतर्फा केली होती.
आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते भव्य कार्यक्रमात वृक्ष लागवड शुभारंभ करण्यात आला होता. पावसाळ्यात करण्यात आलेल्या या झाडांना यावर्षांच्या भरपूर पावसामुळे काही झाडे जगून निघाली. परंतु पावसाळ्यानंतर या झाडांना पाणी घालण्याबाबत या कंपनीने अक्षम्य बेफिकीरी दाखविल्यामुळे पाणी न मिळाल्यामुळे मोठया प्रमाणात झाडे जळून गेली आहेत. केवळ कंपनीने वृक्षारोपणाचा शो केला पण झाडे जगविण्याची जबाबदारी मात्र न घेतल्यामुळे हा भाग तसाच उजाड राहणार आहे.
कंपनीतर्फे दि.7 जून हा वृक्षारोपण दिवस म्हणून साजरा केला जातो. कंपनीने पर्यावरणाचे महत्व लक्षात घेवून करंज, वड, चिंच, पिंपळ, लिंब आदी झाडांची रोपे रस्त्याच्या दोन्ही बाजूला 10 मीटर अंतरावर व दोन्ही वृक्षांमध्ये 7 मीटर अंतर ठेवून वृक्ष लागवड करण्यात आली होती. वृक्ष लागवडीनंतर झाडे जगविण्याची 10 वर्षाची जबाबदारी घेणार्या या कंपनीला वर्षभरही झाडे जगविता आली नसल्याची चर्चा या भागात सुरू आहे.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |