05:00pm | May 21, 2022 |
सातारा : पुणे शहरातील ऐतिहासिक लाल महल या वास्तूला ऐतिहासिक महत्त्व असून महाराष्ट्रातील संपूर्ण शिवप्रेमींची अस्मिता आहे. या वास्तूतील छत्रपती शिवराय आणि राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या शिल्पाचे पावित्र्य मोठे आहे. येथे चित्रीकरण कसे झाले? मुळात लाल महल आणि त्याचा अंतर्गत भाग ही चित्रीकरणाची जागा नाही याचे भान संबंधितांनी ठेवायला हवे. तसेच संबंधित चित्रीकरण सिनेमात वापरण्यात येऊ नये. ज्यांनी या चित्रीकरणाला परवानगी दिली अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी सोशल मीडियातून केली आहे.
पुणे येथील ऐतिहासिक लाल महालामध्ये एका चित्रपटाच्या गाण्याचे चित्रिकरण सुरू असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने त्याची चर्चा सुरू झाली आहे. त्या संदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांनी आपला संताप व्यक्त केला आहे .
त्यांनी ट्विटरवर दिलेल्या एका प्रतिक्रियांमध्ये नमूद आहे की लाल महाल ही वास्तू नाचगाण्याच्या चित्रीकरणाची जागा नाही. याठिकाणी ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक प्रश्नासंबंधित चित्रीकरणास आमचा आक्षेप नाही. पण या वास्तूचा इतिहास लक्षात घेऊन चित्रीकरण आणि त्याचे विषय निवडणे गरजेचे आहे. केवळ व्यवसाय म्हणून कोणी या वास्तूचा वापर करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. पोलिसांनी दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
मुळात ही वास्तू पुणे महानगरपालिका ताब्यात असून या चित्रीकरणासाठी महापालिकेची रीतसर परवानगी घेतली आहे काय ? कोणत्या अधिकाऱ्यांनी ही परवानगी दिली ? जर परवानगी दिली असेल तर कोणती परवानगी दिली गेली ? याची चौकशी झाली पाहिजे, असे सवाल उदयनराजे यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारले आहेत.
'आम्हाला डुक्कर म्हणता, अहो याच डुकरांची मतं घेऊन खासदार झालात' |
साताऱ्यात १७ जुलै रोजी मोफत 'जयपूर फूट' शिबीर |
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा |
फिरते लोकन्यायालय मोबाईल व्हॅनचा प्रमुख शुभारंभ |
श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालयात 8 जुलै रोजी मोफत कोरोना लसीकरण |
श्री सेवागिरी महाराजांच्या पायी पालखी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान |
अजय चौधरी यांच्या गटनेतेपदाची निवड रद्द करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना नाही |
भास्कर जाधव यांच्या आक्रमक टीकेनंतर सभागृहात चांगलाच गोंधळ |
चिमूटभर गुणरत्न सदावर्ते टाकायचे आणि संजय राऊत तयार |
शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही फुटीची चिन्हे ? |
काही लोक पक्ष सोडून गेले म्हणून शिवसेना संपली नाही |
नटराज मंदिर परिसरातील खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात |
बहुमत चाचणीवेळी शिंदे-फडणवीस सरकारला काँग्रेस-राष्ट्रवादीची 'अदृश्य'मदत |
एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारचा विजयी झेंडा |
कोयनेच्या त्यागातून लाभला महाराष्ट्राला मुख्यमंत्री |

केदारेश्वर महाराज कोरेगाव दिंडीचे वर्धनगड येथे उस्फूर्त स्वागत |
विठुरायाच्या महापूजेनंतर दुसऱ्या दिवशी सरकार राहणार नाही |
शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त |
मराठा म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी |
विजयोत्सवाला देवेंद्र फडणवीसांची दांडी |