07:45pm | Sep 25, 2021 |
सातारा : महाराष्ट्राला दोन दोन गृहराज्यमंत्री असताना राज्यात महिला अत्याचारांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. सातारा जिल्ह्यातच बलात्काराच्या पाच घटना समोर आल्या, त्यावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी चकार शब्द काढला नाही. आता महाबळेश्वरच्या अत्याचार प्रकरणात ते म्हणतात आरोपींना सोडणार नाही. पण किमान त्यांना आधी पकडा तरी साहेब, असा राजकीय निशाणा भाजप महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी गृहराज्यमंत्री देसाई यांच्यावर साधला.
चित्राताई वाघ यांनी महाबळेश्वर येथे पीडित युवतीची भेट घेऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय बावळेकर यांना सहआरोपी करण्याची जोरदार मागणी केली.
चित्रा वाघ पुढे म्हणाल्या सातारा जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात महिलांवर अत्याचाराचे पाच प्रकार घडले. त्या घटनांवर राज्याचे गृहराज्यमंत्री काहीच बोलले नाहीत. राज्याला दोन गृहराज्यमंत्री आहेत. हे दोन्ही राज्यमंत्री आहेत कुठे?, राज्यात हाहाकार माजला आहे. कधी बोटभर प्रतिक्रिया या दोन्ही गृहराज्यमंत्र्यांनी दिलेली नाही. परंतु महिला अट्रॉसिटी प्रकरणात शंभूराजेंनी कोणाला सोडणार नाही असे वक्तव्य केले आहे. त्यांना मला विचारायचे आहे की त्यांनी आतापर्यंत कोणाला पकडले आहे हे जाहीर करावे, या शब्दात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा चित्रा वाघ यांनी जोरदार समाचार घेतला.
यावेळी भाजपच्या जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले, सुनेशा शहा, नेहा खैरे यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
प्रत्येक गोष्टीचा तपास निष्पक्षपणे व्हावा. महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष हे कुठल्या पक्षाचे आहेत हे न पहाता त्यांनाही सहआरोपी का पोलिसांनी केलेलं नाही. दत्तात्रय बावळेकर यांच्यासमोर दत्तक विधान होत असेल तर सहआरोपी करण्यात यावे. त्यांच्या मुलाची वकीलीची सनद रद्द करण्यात यावी, या प्रकरणात एसपी, डीवायएसपी लक्ष घालतील का असा परखड सवालही त्यांनी केला. रोज कोणा ना कोणाची अब्रु लुटली जाते आहे. पिडीताच्या जखमेवर मीठ चोळण्याचे प्रकार होत आहेत. वेदनेची थट्टा मुख्यमंत्र्यांनी चालवली आहे. याची लाज वाटते, असाही आरोप चित्रा वाघ यांनी केला.
संजय राऊत तुम्ही कोणाचे थोबाड फोडाल
संजय राऊत तुम्ही विरोधकांचे थोबाड फोडायचे म्हणाला होतात ना. कोणाचे थोबाड फोडणार सांगा तुम्ही. राज्यात महिलावर अत्याचार वाढलेत तुमच्यात आहे का हिंमत सरकारचे थोबाड फोडायची. दिवसातून तीन-तीन वेळा टीव्हीवर येता, सकाळी तेच सांगता, दुपारी तेच सांगता आणि संध्याकाळीही तेच सांगता. महिला अत्याचाराच्या घटना भाजपाच्या राज्यात घडल्या आहेत असे म्हणता, वेगवेगळय़ा प्रदेशात महिला अत्याचाराच्या घटना वाटणारे तुम्ही कोण? जगात घडत असलेल्या घटनेची जाणीव आम्हाला आहे. राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांची टक्केवारी 13.2 एवढी आहे, अशीही टीका चित्रा वाघ यांनी केली.
वाईच्या डीवायएसपी शीतल जानवे-खराडे यांचे दबंग पोलीस अधिकारी म्हणून चित्रा वाघ यांनी कौतुक केले. पण महाबळेश्वर पोलिसांसह राज्यातील महिला अत्याचाराच्या जेथे-जेथे घटना घडल्या आहेत. तेथील पोलीस अधिकाऱ्यांवर टीप्पणी चित्रा वाघ यांनी केली. एवढेच काय तर पारनेरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आमदार निलेश लंके हे धावून जाताना तेथील पोलीस निरीक्षक बळीप हा नुसता उभा राहिला होता, अशीही जळजळीत टीप्पणी त्यांनी केली. अशा पोलीस अधिकाऱ्यांमुळे मेहबुब शेख सारख्याची 376 च्या प्रकरणामध्ये समरी ब करण्यात आली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |