सातारा: उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सातार्यात पाणीपुरवठा मुबलक व्हावा, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि पाणीपुरवठा विभाग यांची संयुक्त बैठक सातारा नगरपालिकेत घेण्यात आली. या बैठकीमध्ये अनेक नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील लिकेज काढण्यासह विविध सूचना प्राधिकरणाच्या अधिकार्यांना केल्या.
नगराध्यक्षा माधवी कदम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे जंगम, गायकवाड, अग्रवाल, पाणीपुरवठा सभापती सीता हादगे, नियोजन सभापती स्नेहा नलवडे, नगरसेवक निशांत पाटील, ज्ञानेश्वर फरांदे, महिला व बालकल्याण सभापती रजनी जेधे, नगरसेवक शेखर मोरे-पाटील, बाळासाहेब ढेकणे यावेळी उपस्थित होते.
शहरातील टाक्यांना रंगकाम करुन सुशोभिकरण करणे, दरे खु॥ शाहूपुरी या ग्रामपंचायती पालिकेकडे वर्ग झाल्यामुळे 31 मार्चपर्यंत त्या गावांचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे, कास धरणाची उंची वाढल्यानंतर सांबरवाडी येथून बोगदा ते चारभिंतीवरील टाकीत ते पाणी टाकून तेथून गोडोली व परिसरातील भागाला पाणीपुरवठा सुरळीत करणे, करंजे पेठ येथील चोकअप काढणे, स्पीड मार्ग- जिल्हा परिषद ते सर्कीट हाऊस- स्टेडिअम कोपरा- गोळीबार मैदान या परिसरातील लिकेज काढणे, सुमित्राराजे उद्यान नवीन बोअरिंग बसवणे, तालुका पोलीस स्टेशनच्या शेजारी असणार्या टाकीला रंग देणे, बाफना स्टील- मोळाचा ओढा येथील पाईपलाईनची तसेच दरे बु॥ पाणीपुरवठा योजनेची पाहणी करणे, साक्षी पार्क येथील पाईप लाईन कनेक्शन तपासणी करणे, 3 मार्च रोजी शाहूपुरी पाणीपुरवठा योजनेची पाहणी करणे, तसेच पोळवस्ती येथील लिकेज काढणे विशेषकरुन या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. ग्रेड सेपरेटरमध्ये पाणी येत असल्यामुळे त्याबाबत काय उपाययोजना करायच्या, तसेच भिमाबाई आंबेडकर झोपडपट्टी येथील नळ कनेक्शन बंद करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
पाणीपुरवठा सभापतींना गुलाब पुष्प आणि तुळस भेट
केसरकर पेठ येथील एका बिल्डिंगला नळ कनेक्शन दिले होते. मात्र, तेथे पाणी मिळत नव्हते. याबाबत तेथील महिला सातत्याने तक्रारी घेऊन येत होत्या. याबाबतची माहिती पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी जाऊन, पाहणी करुन संबंधित महिलांना पाणी उपलब्ध करुन दिल्याने सीता हादगे यांचा त्या महिलांनी तुळस व गुलाब पुष्प देवून सत्कार केला.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |