01:47pm | Aug 26, 2020 |
नवी दिल्ली: यामुळे काही तज्ज्ञ हिवाळ्यापर्यंत कोरोनाची लस येण्याचा अंदाज व्यक्त करत आहेत. तर काही तज्ज्ञ कोरोना पावसाळ्यापेक्षा हिवाळ्यात जास्त खतरनाक पद्धतीने पसरणार असल्याचे सांगत आहेत. थंडीमध्ये येणारी कोरोनाची दुसरी लाट पहिल्यापेक्षाही जास्त खतरनाक असू शकते, असे या तज्ज्ञांचे मत आहे.
चीनमध्ये पसरलेल्या कोरोनाने आतापर्यंत 213 देशांमध्ये कहर माजविण्यास सुरुवात केली आहे. जवळपास 2 कोटी 20 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 8 लाखांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. कोरोना लस पुढील दोन महिन्यांत येणार आहेत. लस विकसित करणार्यांसाठी एक चांगली बाब म्हणजे कोरोना रुप बदलत नाहीय.
जागतिक आरोग्य संघटनेसोबत काम केलेल्या इंफेक्शियस डिसीज एक्सपर्ट क्लाउज स्टोहर यांचा एक लेख ‘द प्रिंट’मध्ये छापून आला आहे. या अहवालानुसार कोरोना व्हायरसचे एपिडेमायोलॉजिकल बिहेविअर कोणत्याही अन्य रेस्पिरेटरी डिसीजपासून वेगळे नसते. यामुळे आता सुस्त झालेला व्हायरस थंडीत पुन्हा सक्रीय होऊ शकतो. जगाला कोरोनाच्या दुसर्या लाटेपासून लढण्यासाठी तयार रहायला हवे. कोरोनाची संभाव्य लाट सध्याच्या लाटेपेक्षाही जास्त धोक्याची असू शकते. ब्रिटेनच्या अकादमी ऑण मेडिकल सायन्सचे देखील असेच मत आहे. येथील तज्ज्ञांनुसार 2021 च्या जानेवारी, फेब्रुवारीमध्ये 2020 च्या सुरुवातीला जे हाल होते तसेच असणार आहेत.
ब्रिटेनचे मुख्य मेडिकल ऑफिसर क्रिस व्हिट्टी यांनी सांगितले की, कोरोना लसीच्या भरवशावर राहणे चुकीचे आहे. न्यू स्कायला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्याला पुढील हिवाळ्यापर्यंत लसीशिवाय लढण्यासाठी तयार रहायला हवे. हिवाळ्यात लस मिळेल असा विचार करणे मुर्खपणाचे होईल. कदाचित माझे म्हणणे चुकीचेही ठरेल.
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |