08:42pm | Jul 29, 2021 |
सातारा : कोंडवे ता. सातारा येथील अमन ईलाही नालबंद हा २३ वर्षीय युवक ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेला होता. या मृताच्या कुटुंबियांना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाकडून तातडीने पाच लाखाची मदत देण्यात आली. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी नालबंद कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला आणि पुढेही काहीही मदत लागल्यास करण्याचा शब्द दिला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतीक कदम, पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर, तहसीलदार आशा होळकर, गट विकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, दिलीप निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, माजी सभापती धर्मराज घोरपडे, सरपंच किरण गाडे, महेश गाडे, गणेश निंबाळकर, मधुकर निंबाळकर, पोलीस पाटील बाबुराव गायकवाड आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, नैसर्गिक आपत्तीमध्ये लोकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. नालबंद कुटुंबीयांनी त्यांचा एकुलता एक मुलगा गमावला आहे. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसला आहे. या कुटुंबाला शासनाकडून ५ लाख रुपयांचा मदत निधी देण्यात आला आहे. या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी असून त्यांना लागणारी मदत केली जाईल. पुराच्या पाण्यामुळे वाहून गेलेले कोंडवे ओढ्यावरील दोन्ही पूल म्हणजेच सारखळ जवळील पूल आणि गाडं उतार पूल या दोन्ही पुलांचे काम लवकरच मार्गी लावण्यात येईल, असेही ते म्हणाले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |