08:31pm | Mar 06, 2021 |
सातारा : बंदी असलेल्या गुटख्याची विक्रीसाठी वाहतूक करताना एकास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 84 हजार 756 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातून बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. माहिती मिळाल्यानुसार किशोर धुमाळ यांनी त्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे दिनांक 5 रोजी सायंकाळी 6.15 वा. सुमारास पथकातील पोलीस अंमलदार यांनी महानुभाव मठ करंजे सातारा येथे जावून सापळा लावून थांबले असताना एक इसम होंडा डिओ मोपेड क्र. एम.एच.11 सीएस/3284 वरुन पोत्यामध्ये हिरा पान मसाल्याचे 90 पुडे व रॉयल तंबाखूचे 89 पुडे (हिरा गुटखा) असा घेवून जाताना मिळून आला असून त्याच्या ताब्यातून वरील माल व इतर साहित्य असा एकुण 84 हजार 756 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. त्याबाबत शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचनाप्रमाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, सहायक फौजदार तानाजी माने, जोतीराम बर्गे, पो.हवा. अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे,संतोष पवार, पो.ना.शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, निलेश काटकर, अमित सपकाळ,विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, पंकज बेसके यांनी सदरची कारवाई केलेली असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |