11:14am | Nov 22, 2020 |
कराड : विनापरवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारास ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. आटके टप्पा, नारायणवाडी (ता. कराड) गावच्या हद्दीत प्रणव वाईन शॉपच्या समोरील रस्त्यावर शनिवार, दि. 21 रोजी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास कराड तालुका पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली.
अभिजीत दत्तात्रय विभूते (वय 42, रा. कालेटेक, ता. कराड) असे बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी कारवाई केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना आटके टप्पा परिसरात बेकायदा पिस्तूल घेऊन एकजण फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी सपोनि गणेश कड व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस सज्जन जगताप, अमित पवार, शशिकांत काळे, शशिकांत घाडगे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्यांनी आटके टप्पा येथे जाऊन सापळा रचला. त्याच दरम्यान संशयित अभिजित विभूते हा प्रणव वाईन शॉपसमोरील रोडवर असल्याची माहिती पोलिसांना समजली. पोलिस समजलेल्या ठिकाणाकडे जात असतानाच संशयित वाईन शॉपसमोरील कच्च्या रोडने चालत येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने पोलिसांनी त्याला त्वरित ओळखले. तसेच पळून जाऊ नये म्हणून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता कमरेजवळ जीन्समध्ये देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल मिळून आले. त्याच्याकडे परवाना आहे का? असे विचारले असता त्याने नाही असे उत्तर दिले. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पिस्तुल जप्त केले.
पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधिक्षक धीरज पाटील, डीवायएसपी डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या आदेशानुसार सपोनि गणेश कड व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस नाईक सज्जन जगताप, अमित पवार, शशिकांत काळे, शशिकांत घाडगे यांनी ही कारवाई केली. याबाबत पोलिस नाईक अमित पवार यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास सपोनि गणेश कड करीत आहेत.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |