पुसेगाव: इंडियन बॅाडी बिल्डिंग एँड फिटनेस फेडरेशनच्या 11 वी पुरुषांची युवा गट फिजिक नॅशनल चॅम्पियनशीप 2021 या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत सिध्देश्वर कुरोली (ता.खटाव) येथील अंकित देशमुखने 75 वजनी गटात चमकदार कामगिरी करत ब्राँझ पदकाला गवसणी घातली. भारत सरकारच्या क्रीडा व युवक सेवा संचलनालयाची मान्यताप्राप्त द इंडियन बॅाडी बिल्डर्स फेडरेशनने यांच्या सयुक्त विद्यमाने लुधियाना (पंजाब) येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विविध राज्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
अंकित देशमुख सातारा येथील धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयात बॅचलर ऑफ कंम्प्युटर अॅप्लिकेशनच्या अंतिम वर्षात शिकत असून गेली पाच वर्षापासून या खेळासाठी सराव करत आलेला आहे. त्याला या खेळात पुणे स्थित संग्राम चौगुले (सर) यांचे मार्गदर्शन लाभले. पुढच्या वर्षी होणार्या मिस्टर इंडिया सिनिअर गटात निवड होण्यासाठी तो सध्या कसून सराव करत आहे. त्याच्या या यशाबद्दल आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्राचार्य पी.एस.गायकवाड यांनी आमच्या कॉलेजसाठी हा गौरवाचा क्षण असल्याचे सांगत अंकितचे अभिनंदन केले. या खेळासाठी अंकितची आई अनिता देशमुख, बंधू आदर्श देशमुख व मामा दिपक घाडगे यांचे नेहमीच प्रोत्साहन मिळाल्याचे अंकितने सांगितले.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |