03:23pm | Aug 07, 2020 |
सातारा: परळी (ता. सातारा) खोर्यातील 70 पेक्षा अधिक वाडी, गावांसाठी परळी येथे पोलीस औट पोस्ट असून त्यामध्ये केवळ दोन पोलिस कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली असल्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण येत आहे. परळी खोर्याचे दुर्गम आणि भौगोलिक क्षेत्र पाहता त्या ठिकाणी पोलीस कर्मचार्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याची गरज निर्माण झाली आहे.
ठोसेघर पठार भागातील परळी गाव हे एक व्यापार पेठ समजले जाते. सातारा तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असणार्या जांभे, चाळकेवाडी, मालदेव, ठोसेघर, पांगारे, राजापुरी, बोंडारवाडी, बोरणे आदी 70 पेक्षा अधिक वाड्या-वस्त्यासाठी परळी येथे पोलीस औट पोस्ट उभारण्यात आले आहे. परळी खोरे हे मुळात खोलगट आणि डोंगर पठारावर वसलेले आहे. यातील बहुतांश गावे डोंगरावर आहेत. परळी खोर्यात घरगुती वाद, ट्रॉसिटी, शेतीवरून वाद- भांडणे आदी स्वरूपाच्या केसेस दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. मुळात पोलीस औट पोस्टपासून कार्यक्षेत्रात असणारी गावे खूप दूरच्या पल्ल्यावर आहेत. एखादी दुर्घटना अथवा गुन्हा घडल्यानंतर त्या गावात पोचण्यासाठी परळी येथून साधारण अर्धा ते पाऊण तासाचे अंतर लागते. परळी पोलीस औट पोस्टला पोलिस वाहन देण्यात न आल्यामुळे पोलीस कर्मचार्यांना स्वतःच्या दुचाकीवरूनच घटनास्थळी दाखल व्हावे लागते. मुळात दोनच पोलीस कर्मचार्यांवर 70 पेक्षा अधिक वाडी आणि गावांचा कार्यभार सोपविण्यात आल्यामुळे एकाच वेळी दोन ठिकाणी गुन्हे घडल्यानंतर पोलिसांची फार मोठी कुचंबणा होते. प्राधान्यक्रम ठरवूनच त्यांना त्या ठिकाणी पोहोचावे लागते.
परळी पोलीस औट पोस्टच्या अंतर्गत पर्यटन क्षेत्र म्हणून नावारूपाला आलेले ठोसेघर हे गाव येते. याठिकाणी येणार्या पर्यटकांची संख्या फार मोठ्या प्रमाणात असते. पावसाळी हंगामात गाड्या आडव्या मारणे, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, रस्त्यावर धिंगाणा घालने, धबधबा परिसरात महिलांची छेड काढणे असे प्रकार सर्रास घडतात. पावसाळी हंगामात सातारा तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचारी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी धबधबा परिसरात नेमण्यात येत असले तरी ठोसेघर हा हंगाम केवळ पावसाळी राहिला नाही. या ठिकाणी बारा महिने येणार्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. विशेषता चाळकेवाडी येथील पठारावर फिरण्यासाठी येणार्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. त्यामध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. याठिकाणी मद्यप्राशन करून दंगामस्ती करणे, दरीच्या कडेला उभा राहून सेल्फी काढणे असे प्रकार सर्रास घडतात. त्यातून वादावादी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, मात्र त्या कधीही पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्या नाहीत. हीच परिस्थिती उरमोडी धरण परिसरात बर्याचदा पाहायला मिळते. उरमोडी धरण परिसर सध्या पर्यटनासाठी आवडते ठिकाण म्हणून प्रसिद्ध होऊ लागले आहे. विशेषता याठिकाणी तरुणांच्या ओल्या - सुक्या पार्ट्या मोठ्या प्रमाणावर होतात. त्यातून वाद किंवा एखादी अनुचित घटना घडू शकते. ठोसेघर आणि उरमोडी धरण परिसर ही दोन पर्यटन स्थळे आणि सज्जनगड हे धार्मिक स्थळ पाहता परळी पोलीस औट पोस्टला केवळ दोन पोलीस कर्मचारी पुरेसे ठरत नाहीत. तेथे काम करणार्या पोलिस कर्मचार्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत असल्यामुळे त्याठिकाणी पोलिसांची संख्या वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |