06:02pm | May 13, 2021 |
सातारा : जिल्ह्यातील सांस्कृतिक कला केंद्रावरील कलाकारांना रेशनकार्ड, शासकीय मानधन, मदत द्यावी आणि त्यांची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी तर्फे सातारा जिल्हा उपाध्यक्ष ऍड. प्रशांत खामकर यांनी सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हणले आहे की, सातारा जिल्ह्यामध्ये अनेक सांस्कृतिक कला केंद्र आहेत. या ठिकाणचे कलाकार हे लोकांचे मनोरंजन करत असतात. लोकांना आनंदी ठेवण्याचे काम या कलाकारांकडून होत असते, त्यातून त्यांना त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटण्या एवढेही उत्पन्न मिळत नाही. तसेच त्यांच्या गरजाही पूर्ण होत नाहीत.
गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे सर्व सांस्कृतिक कलाकेंद्र बंद आहेत. त्यामुळे यामधील कलाकारांचे उत्पन्न पण बंद आहे आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्या साठी इतरांसमोर भीक मागावी लागत आहे. हे कलाकार अनेक ठिकाणावरून येत असतात. त्यामुळे त्यांचा कायमचा पत्ता नसल्यामुळे त्यांना रेशनकार्ड मिळत नाही आणि त्यामुळे धान्य मिळण्यास अडचण निर्माण होते.
त्यामुळे सांस्कृतिक कला केंद्राच्या पत्त्यावर रेशन कार्ड देण्याची व्यवस्था करावी, त्यांना शासकीय मानधन चालू करावे, शासकीय मदत द्यावी आणि सर्वांची मोफत वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. याच बरोबर माहितीसाठी आणि कार्यवाहीसाठी सातारा जिल्ह्यातील सांस्कृतिक कला केंद्रावरील ५०० कलाकारांची यादी, आधार नंबर आणि मोबाईल नंबरसह दिली आहे. मागणी निवेदनाची प्रत माहिती आणि कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांना सुद्धा पाठवण्यात आली आहे
यावेळी भाजपा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. उत्कर्ष रेपाळ, अनु जाती मोर्च्या जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कांबळे, वैद्यकीय आघाडी सातारा शहराध्यक्ष डॉ वीरेंद्र घड्याळे, सातारा शहर सरचिटणीस विक्रांत भोसले, उपाध्यक्ष चंदन घोडके, युवा मोर्च्या सातारा शहर अध्यक्ष विक्रम बोराटे, सांस्कृतिक कला केंद्र कलाकारांचे प्रतिनिधी युवराज मोरकर उपस्थित होते.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |