03:22pm | Nov 27, 2020 |
सातारा: पुणे विभाग पदवीधर मतदार संघ भाजपा आणि मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार संग्राम संपतराव देशमुख, तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे भाजपापुरस्कृत अधिकृत उमेदवार जितेंद्र दत्तात्रय पवार हे दोन्हीही कार्यक्षम व उत्साही कार्यकर्ता उमेदवार आहेत. या दोघांची युवक आणि शिक्षकांप्रती असणारी तळमळ आणि त्यांची अभ्यासपूर्ण मुद्ये मांडण्याची सुयोग्य पध्दत हेरुन, यंदाच्या पुणे पदवीधर मतदार संघात, भाजपाने त्यांच्यावर विश्वास दर्शवला आहे. भारतीय जनता पार्टीने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी, पुणे विभागातील पदवीधर मतदार बंधु-भगिनीं आणि शिक्षक मतदार बंधुभगीनींनी, अनुक्रमे संग्राम देशमुख व जितेंद्र पवार यांनाच प्रथम पसंतीचे मत देवून, प्रचंड मताधिक्याने निवडुन दयावे असे आवाहन राज्यसभा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
भाजपा हा भारतात सर्वदूर विस्तारलेला सध्याच्या काळातील एकमेव पक्ष आहे. भाजपा सामाजिक बांधीलकीच्या जाणिवेतुन, समाजातील सर्व स्तरातील आणि सर्व घटकांसाठी अहोरात्र झटत आहे. सध्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांतदादा पाटील या दोघांनी मिळुन एखादा अपवाद वगळता, पुणे पदवीधर मतदार संघ भाजपाकडे राखलेला आहे. यंदाच्या वेळी पुणे पदवीधर मधुन संग्राम देशमुख यांना उमेदवारीची संधी देण्यात आली आहे.
पुणे विभागातील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार असलेले जितेंद्र पवार यांचे शिक्षण क्षेत्रात अनमोल योगदान आहे. त्यांच्या ज्ञानाचा लाभ सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सहकार्यांना व्हावा म्हणून भाजपाने त्यांना पुरस्कृत केले आहे.
पुणे पदवीधर मतदार संघातुन संग्राम देशमुख आणि शिक्षक मतदार संघातील जितेंद्र पवार या दोघांना आम्हीच उमेदवार आहोत असे समजुन, पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी आपल्या पहिल्या पसंतीचे मत दयावे असे आवाहन आहे असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |