11:58am | Nov 24, 2021 |
जावली : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीत सर्वसामान्य कुटुंबातील ज्ञानदेव रांजणे यांनी विजय मिळवून इतिहास रचाला आहे. रांजणे यांचा विजय झाल्याने जावळी तालुक्याला हक्काचा संचालक जिल्हा बँकेत मिळाला आहे. येणाऱ्या निवडणूकांमध्ये जावळी तालुक्यात विजय मिळवून दादागिरीचे राजकारण हद्दपार करू, असा विश्वास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.
मेढा येथे मानकुमरे पॉईंटवर जिल्हा बँकेवर निवडुन आल्याबद्दल रांजणे यांचा सत्कार आमदार भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे, जिल्हा परिषद सदस्य अर्चना रांजणे, माजी सभापती अरुणा शिर्के, मेढ्याचे नगराध्यक्ष पांडुरंग जवळ, मालोजीराव शिंदे, ऍड. शिवाजीराव मर्ढेकर, रवींद्र परामने, तुकाराम धनावडे, मोहनराव कासुर्डे, रामभाऊ शेलार, कांतिभाई देशमुख, जयश्री मानकुमरे, जयदीप शिंदे यांची उपस्थिती होती. यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली.
आमदार भोसले म्हणाले, या निवडणूकीत वसंतराव मानकुमरे यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. रांजणे यांचा विजय झाल्याने 'जो जिता वही सिकंदर' ठरले आहेत. जावळी तालुक्यात कुणीही कितीही लक्ष घालूद्या प्रत्येक निवडणूकीत आम्ही तुमचे आव्हान परतवून लावू. आमदार शिंदे यांनी आपल्या पराभवाची करणे शोधावित. आपल्या चुका शोधा. पराभवाचे खापर फोडण्याऐवजी आत्मतपरिक्षण करावे.
तालुक्याचा विकास व्हावा, अशीच माझी भूमिका असून कुणीही अंगावर आले, तरी शिंगावर घेण्याची माझी तयारी आहे. रांजणे यांना निवडून देणारे सर्व मतदार त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले आणि धमक्या दादागिरी या सगळ्या गोष्टींना पुरून त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांना ताकद दिली आणि या सर्वांचे मार्गदर्शक किंवा सगळ्यांना एकत्र ठेवण्याचे आणि शेवटपर्यंत पण एकत्र राहण्याची भूमिका बजावण्याचे काम मानकुमरे यांनी केले.
वसंतराव मानकुमरे यांनी सगळ्यांना एक ताकद देण्याचे काम केले. डोंगरी तालुक्यातला म्हणा काही म्हणा पण राजकीय उदय रांजणे यांच्या मागे फार मोठे वलय नसताना त्यांचा विजय झाला. आम्ही सगळे जण मिळून जिल्हा बँकेत चांगले काम करू. यावेळी वसंतराव मानकुमरे यांचेही भाषण झाले.
रांजणे म्हणाले, हा विजय तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा विजय असून यापुढे ही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात जिल्हा बँकेच्या माध्यमातून चांगले काम करून जनतेची सेवा करेन, निवडून देणारे सर्व मतदारांचे तसेच कार्यक्रम उपस्थितांचे आभार मानले.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |