04:42pm | May 25, 2020 |
टोकियो: लॉकडाउनमुळे जगातील तिसर्या अर्थव्यवस्थेवर मंदीचे मोठे सावट होते. जपानच्या अर्थव्यव्यवस्थेला त्याचा मोठा फटका बसला. अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत चालावी यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर करोना संसर्गावर नियंत्रण मिळवले असल्याचे समोर आल्यानंतर ही आणबाणी हटवण्यात आली आहे. त्यामुळे जपानची अर्थव्यवस्था पुन्हा वेग पकडणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
करोनाच्या संसर्गामुळे जपानमध्ये लागू करण्यात आलेली आणीबाणी अखेर मागे घेण्यात आली आहे. पंतप्रधान शिंजो आबे यांनी याबाबत घोषणा केली. करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जपानमध्ये मागील महिन्यात आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. आणीबाणी हटवल्यामुळे जपानच्या अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती पुन्हा वेग पकडणार आहे.
पत्रकार परिषदेत पंतप्रधान शिंजो आबे यांनी याबाबत सांगतिले की, राजधानी टोकियोसह इतर महत्त्वाच्या राज्यात लागू करण्यात आलेली आणीबाणी मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे आता जनजीवन पूर्वपदावर येणार आहे. आणीबाणी हटवण्यासाठी आम्ही काही निकष, उद्दिष्ट ठरवले होते. त्या उद्दिष्टांपर्यंत आम्ही पोहचलो असल्यामुळे आणीबाणीचा निर्णय मागे घेण्यात येत आला आहे. करोनाशी दोन हात करण्यात जपानला यश आले असल्याचे त्यांनी सांगितले. जपानमध्ये करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे 7 एप्रिल रोजी टोकियो, ओसाकासह सैतमा, कांगवा, चीबा, हयोगो आणि फुकुओका या राज्यांत आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. त्याानंतर संपूर्ण देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली होती.
जगभरातील इतर देशांच्या तुलनेने जपानमध्ये करोनाबाधितांची संख्या मर्यादित असल्याचे आढळले. जपानमध्ये सोमवारपर्यंत 16 हजार 550 जणांना करोनाची बाधा झाली होती. तर, 820 जणांचा मृत्यू झाला असल्याची नोंद आहे. जपानमध्ये लॉकडाउनचे आणि त्याच्याशी निगडीत निर्बंधाचे कसोशीने पालन करण्यात आले होते.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |