सातारा : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालला असून आज भल्या सकाळी सातार्यातील बाधितांनी पन्नाशी पार केली असून तिघा बाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित मृतकांचा आकडा 12 झाला आहे, तर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 394 वर पोहोचली आहे.
जिल्ह्यातील कोरोना केअर सेंटर, जिल्हा रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालयांमध्ये अनुमानित म्हणून दाखल असलेल्या तब्बल 52 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. काल दि. 26 रोजी दिवसभरात कोरोनाचे 6 रुग्ण सापडले होते, तर चारजण कोरोनामुक्त झाले होते. कालच जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढणार अशी भीती व्यक्त केली जात होती. आज भल्या सकाळीच जिल्ह्यातील 52 कोरोना अनुमानितांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील नागरिकांना धडकी भरली आहे. आज निष्पन्न झालेले 90 टक्के लोक हे मुंबईवरुन आले असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, आसले, ता. वाई येथे मुंबई वरुन आलेल्या कोविड बाधिताचा मृत्यू झाला आहे. तसेच जांभेकरवाडी, ता. पाटण येथील 70 वर्षीय बाधित महिला, माण तालुक्यातील भालवडी येथे मुंबई वरुन आलेल्या 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 12 वर पोहोचली आहे.
आज निष्पन्न झालेल्या कोरोना बाधितांची तालुकानिहाय आकडेवारी - माण तालुक्यातील म्हसवड येथील 48 वर्षीय पुरुष, तोंडले येथील 58 वर्षीय पुरुष, भालवडी 62 वर्षीय पुरुष (मृत्यु), लोधवडे येथील 34 वर्षीय व 28 वर्षीय महिला. खटाव तालुक्यातील वांझोली येथील 52 वर्षीय पुरुष व अंभेरी येथील 14 वर्षीय युवक. सातारा तालुक्यातील खडगाव येथील 48 वर्षीय पुरुष, जिमनवाडी येथील 21 वर्षी युवक कुस बुद्रुक 45 वर्षीय महिला. वाई तालुक्यातील आकोशी येथील 58 वर्षीय पुरुष, आसले येथील 40 वर्षीय पुरुष, मालदपूर येथील 24 वर्षीय पुरुष, देगाव येथील 55 वर्षीय महिला, सिद्धनाथवाडी येथील 25 वर्षीय पुरुष, धयाट येथील 52 वर्षीय पुरुष. पाटण तालुक्यातील धामणी येथील 35 वर्षीय पुरुष, 62 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय पुरुष जांभेकरवाडी 70 वर्षीय महिला, गमलेवाडी येथील 31 वर्षीय पुरुष, मन्याचीवाडी येथील 20 वर्षीय युवक, मोरगिरी येथील 58 वर्षीय पुरुष व 72 वर्षीय महिला, आडदेव येथील 35 वर्षीय पुरुष. खंडाळा तालुक्यातील अंधोरी येथील 72 वर्षीय पुरुष व 8 वर्षीय मुलगा, घाटदरे येथील 47 वर्षीय महिला, पारगाव येथील 27 वर्षीय पुरुष, 62 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला, 50 वर्षीय दोन पुरुष, 25 वर्षीय पुरुष, 78 वर्षीय पुरुष. जावली तालुक्यातील सावरी येथील 39 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला व 7 वर्षांची मुलगी, केळघर येथील 16 वर्षीय युवक 44 वर्षीय पुरुष. महाबळेश्वर तालुक्यातील कासरुड येथील 26 वर्षीय पुरुष व 18 वर्षी युवक, देवळी येथील 9 वर्षाचा मुलगा, 42 वर्षीय पुरुष व एक महिला, गोळेवाडी येथील 42 वर्षीय महिला. कराड तालुक्यातील खराडे येथील 45 वर्षीय महिला व 55 वर्षीय पुरुष, म्हासोली येथील 20 वर्षीय युवती. फलटण तालुक्यातील सस्तेवाडी येथील 21 वर्षीय महिला.
तसेच एन.सी.सी.एस. पुणे यांनी 97 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे कळविले आहे तर क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 59 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे यांच्याकडे तपासणीठी पाठविण्यात आले आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात 394 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 126 रुग्ण बरे झाले आहेत. तर 257 रुग्णांवर उपचार सुरु असून 12 जणांचा मृत्यू झालेला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |