02:03pm | Nov 08, 2022 |
दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मध्य प्रदेशला सुमारे साडेपाच हजार कोटींचे 13 रस्ते प्रकल्प दिले आहेत. दरम्यान, एका रस्त्याच्या निकृष्ट बांधकामाबद्दल गडकरींनी जनतेची जाहीर माफीही मागितली आहे. मंडला आणि जबलपूर येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी यांनी रस्त्यांचे उद्घाटन केले. यावेळी गडकरी यांनी मांडला-जबलपूर महामार्गाबाबत चर्चा करत मांडला ते बारेला या रस्त्याच्या बांधकामाचा उल्लेख केला. यासोबतच त्यांनी महामार्ग बांधकामाच्या दर्जाबाबत नाराजी व्यक्त करत मांडला व परिसरातील नागरिकांच्या रस्त्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल मंचावरून दिलगिरी व्यक्त केली.
राष्ट्रीय महामार्गाच्या जुन्या कामाची दुरुस्ती करून रस्त्याच्या खराब झालेल्या भागाच्या कामासाठी लवकरच नवीन निविदा काढण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मांडला ते बारेला हा चारशे कोटींचा 63 किमी लांबीचा दोन लेनचा रस्ता होत आहे. या कामावर मी समाधानी नाही, असंही गडकरी यावेळी म्हणाले.
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, मांडला हे निसर्गाचे निवासस्थान आहे, ही राणी दुर्गावतीची भूमी आहे आणि कान्हासारखे जगप्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान येथे आहे. आदिवासींच्या विकासासाठी रस्ते बांधणी अत्यंत महत्त्वाची आहे. यावेळी गडकरी यांनी परिवहन मंत्रालयाने देशभरात ऊर्जा क्षेत्रात सुरू केलेल्या नवीन प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. तसेच त्यांनी मध्य प्रदेशात परिवहन क्षेत्रात इलेक्ट्रिक बस चालवण्याची गरज व्यक्त केली.
मांडला, दिंडोरी व इतर आदिवासी भागात बांबू उत्पादनाला चालना देता येईल, असेही गडकरी म्हणाले. भविष्यात बांबूपासून इथेनॉल तयार केले जाईल, ज्याचा वापर वाहतूक आणि इतर क्षेत्रांसाठी ऊर्जा निर्मितीसाठी केला जाऊ शकतो. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, सार्वजनिक बांधकाम मंत्री गोपाल भार्गव, केंद्रीय मंत्री फग्गन सिंह कुलस्ते आणि इतर नेते उपस्थित होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
स्वतःच्याच घरी चोरी करणारा सहा तासात अटकेत |
क्षयरोग निवारणासाठी निक्षय मित्रांची संख्या वाढवूया |
मानवाने सत्कर्म करून पुण्याईचा बॅलन्स ठेवावा |
खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट |
दोन घटनांमध्ये गळफास घेऊन दोन जणांची आत्महत्या |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
एकास दगडाने मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
वेळे येथील अपघातात दोन दुचाकीस्वार ठार |
कर्तव्यावर असताना ट्रॅफिक पोलिसाकडून होमगार्डला मारहाण |
सातारा पोलिसांनी केली जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी तडीपार |
गुढीपाडवा मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरा |
मोदी सरकारच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने |
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जागतिक दर्जाचे विद्यापीठ करण्याचे आव्हान पेलूयात |
अनैतिक संबंधांच्या कारणावरून फलटणमध्ये महिलेचा खून |

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |