सातारा : एक वर्षांपूर्वी खटाव तालुक्याच्या औंध पोलीस ठाणे हद्दीत धाडसी दरोडा टाकून सुमारे 1 लाख 25 हजारांचा मुद्देमाल चोरून पसार झालेल्या मुख्य आरोपीस सातारा ‘एलसीबी’ने अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एक वर्षांपूर्वी खटाव तालुका औंध पोलीस ठाणे हद्दीत पुसेसावळी गावामध्ये रात्रीच्या सुमारास एकाने मोठा धाडसी दरोडा टाकून हॉटेल चालक महिलेस व तिच्या पतीस मारहाण करून 45 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिणे व 80 हजारांची रोख रक्कम असा मुद्देमाल जबरीने धाक दाखवून चोरून नेला होता. तसेच पुसेसावळी गावामध्ये दोन ठिकाणी दरोडेखोरांनी घरामध्ये लोक झोपले असताना कुर्हाड, टिकावाच्या साह्याने दरवाजा तोडून गावातील लोकांवर दहशत माजवून दरोडे टाकण्याचा प्रयत्न करून दरोडा टाकून परजिल्ह्यात पसार झाले होते. याप्रकरणी संबंधित आरोपींवर औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर धाडसी दरोड्यातील काही आरोपींना सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेने अल्पावधीतच भिवंडी (जि. ठाणे) येथून शिताफीने ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा (मोक्का) अन्वये कारवाई केलेली होती.
जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना या गुन्ह्यातील इतर आरोपींना अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. पुसेसावळी येथील धाडसी दरोड्यातील काही आरोपी गुन्हा घडल्यापासून स्वतःची अटक चुकवत सोलापूर, नगर, पुणे येथील त्यांच्या नातेवाइकांकडे राहत लपत फिरत होते. याबाबत पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना बातमी मिळाली की, मोक्क्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा फडतरवाडी (नेर) परिसरात नातेवाइकांना भेटण्याकरिता येणार असून, त्यास ताब्यात घेण्याकरिता पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जर्हाड यांच्या अधिपत्याखाली एक स्वतंत्र पथक नेमून अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
दि. 29 जुलै रोजी पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जर्हाड व त्यांचे पथक सदर परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना सदर आरोपी येणार असलेल्या परिसरामध्ये संपूर्ण पथक स्वतःची ओळख लपवून गुराखी व शेतकर्यांच्या वेशात वेशांतर करून नेर तलाव परिसरामध्ये दिवसभर सापळा लावून थांबून होते. दरोड्यातील मुख्य आरोपी हा परिसरात आला असता त्याला पथकाने शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता सदर गुन्ह्याबाबत त्याने संपूर्ण माहिती पथकाला दिली असून, त्यास या गुन्ह्याच्या पुढील तपासकामी औंध पोलीस ठाण्याकडे वर्ग केले आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |