01:19pm | Aug 03, 2022 |
दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उत्तम कामगिरी करत भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.अंतिम सामन्यात भारतीय टेबल टेनिसच्या पुरुष संघाने सिंगापूरला मात दिल्याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात अजून एका सुवर्ण पदकाची भर पडली आहे.
टेबल टेनिसच्या उपांत्य फेरीत भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने नायजेरीवर ३ - ० अशी मात करत फायलनमध्ये एन्ट्री मिळवली आहे. अंतिम सामना मंगळवारी भारत विरुद्ध सिंगापूर या दोन संघांमध्ये खेळवण्यात आला होता. या अटीतटीच्या सामन्यात भारताने ३-१ च्या फरकाने सिंगापूरवर विजय मिळवला. सामन्यात सर्वात आधी भारताची अप्रतिम जोडी हरमीत देसाई आणि जी साथियान यांनी सिंगापूरच्या योंग क्यूक आणि यू एन पांग यांना १३-११, ११-७ आणि ११-५ अशा तीन सेट्समध्ये मात देत भारताला सामन्यात १-० ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात सिंगापूरच्या क्लियरन्स च्यूयू याने शरथ कमलला ११-७, १२-१४, ११-३ आणि ११-९ अशा फरकाने मात दिल्यामुळे सामन्यात दोन्ही संघ १-१ ने बरोबरीत आले होते.
नंतरच्या तिसऱ्या सामन्यात जी. साथियान याने अप्रतिम खेळ करत कोन पांग याला १२-१०, ७-११, ११-७ आणि ११-४ च्या फरकाने नमवत भारताला २-१ ची आघाडी मिळवून दिली. अखेरच्या सामन्यात हरमीत देसाईने क्लियरन्स च्यूयू याला ११-८, ११-५ आणि ११-६ च्या फरकाने मात देत सामना भारताला ३-१ ने जिंकून दिला. भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाच्या सुवर्ण कामगिरीमुळे यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात पाचव्या सुवर्णपदकाचा समावेश झाला आहे.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |