12:55pm | Apr 28, 2021 |
पुसेगाव: कोरोनाची दुसरी लाट खूप भयंकर रितीने समाजात पसरत असून खटाव तालुक्यातील बुध येथे कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ग्रामदक्षता कमिटीने बुध बंदचा निर्णय घेतला होता. याबाबत परिविक्षाधिन प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी बुध गावाला भेट देवून संपूर्ण भागाची पाहणी केली.
यावेळी लोकनियुक्त सरपंच अभयसिंह राजेघाटगे, ग्रामविकास अधिकारी शशिकांत माने, पत्रकार प्रकाश राजेघाटगे, केंद्र प्रमुख प्रमोद जगदाळे, सर्कल अमृत नाळे, तलाठी किशोर घनवट, बीट अंमलदार सचिन माने, श्री.कुदळे व ग्रामदक्षता कमिटीचे सदस्य उपस्थित होते. कोरोनाचा प्रसार वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. अशा परिस्थितीत गाव तेथे क्वारंटाईन सेंटर उभारण आवश्यक आहे. गाव तेथे क्वारंटाईन सेंटर उभारणी केल्यास जिल्हा परिषद शाळा, हायस्कूलचा वापर केल्यास रूग्ण संख्या कमी करता येऊ शकते. रूग्ण गावातच राहिल्याने घरचा डबा मिळू शकेल, असे प्रांताधिकारी कासार यांनी व्यक्त केले.
यावेळी बुध आरोग्य उपकेंद्रात सुरू असलेल्या लसीकरण केंद्राला त्यांनी भेट दिली. तेथे काही अडचणी आल्यास तात्काळ अडचणी सोडविल्या जातील. लसीकरण मोहिम 100% यशस्वी झाली पाहिजे. यासर्व काळात प्रशासन व ग्रामसुरक्षा कमिटीने हातात हात घालून काम केल्यास करोनाच्या संकटावर मात करू शकतो. गावातील सर्व दुकानदारांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे, बंदच्या काळात दुकाने चोरून दुकाने उघडली तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले.
ग्रामसुरक्षा कमिटीला शासनाने भरपूर अधिकार दिले असून त्या अधिकाराचा वापर कमिटीने करावा. काही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी केले . दरम्यान बुध येथील जिल्हा परिषद शाळा, श्री नागनाथ विद्यामंदिर येथे भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी क्वारंटाईन सेंटर सुरू करावे, असे ग्रामसुरक्षा कमिटीच्या सदस्यांना सांगितले.
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |