08:09pm | Mar 18, 2023 |
सातारा : आरटीओ पथकास चुकवण्यासाठी महाबळेश्वर मधील गल्ली-बोळातून सुसाट कार पळवणाऱ्या कार चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी संबंधित कारचालक अजमुद्दिन वलगे याला एक लाख नव्वद हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. तसेच वाहन चालवण्याचा परवाना सहा महिन्यासाठी रद्द करण्यात आला आहे. ही कारवाई आज शनिवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी वाहतूक निरीक्षक आफरीन मुलांनी यांनी केली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा व प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांचे फिरते पथक महाबळेश्वर येथे दाखल झाले आहे. हे पथक दर महिन्याला शहर व तालुक्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा वाहनकर, वाहन परवाना, वाहन नोंदणी, वाहन पासिंग अशी कागदपत्रे तपासणी करते. पर्यटन स्थळ असल्यामुळे तालुक्यात काळी-पिवळी ट्रॅक्स, टुरिस्ट टॅक्सी जवळपास 800 आहेत. यामध्ये कोणाच्या वाहनाचे कागदपत्रे नसतील, तर कोणाचा परवाना नाही याची संपूर्ण कुंडली असल्याने शहरात आरटीओ आलेले कळताच वाहन चालक-मालक आपले वाहन लपण्याचा प्रयत्न करतात.
इराणी पेट्रोल पंपाजवळ आज सकाळच्या सुमारास परिवहन विभागाचे वाहन पाहता संबंधित कार चालकांनी गाडीसह पळ काढला. वाहतूक निरीक्षक आफरीन मुलांनी यांना त्याचा संशय आल्यामुळे त्यांनी कारचा पाठलाग केला. चालकाने शहराच्या गल्ली-बोळातून कार पळवण्याचा प्रयत्न केला. भरधाव कारने एका दुचाकीला धडकही दिली. या धडकेत कारचा पुढील टायर पंक्चर झाल्याने त्याचा वेग कमी झाला. यावेळी पाठीमागून आलेल्या वाहतूक निरीक्षक आफरीन मुलांनी यांनी चालकास पकडले. त्याच्याकडे अधिक चौकशी करून त्याला महाबळेश्वर आगारात नेले. वाहनाचा वाहनकर सहा वर्षे थकीत होता. त्यामुळे चालकाला कारसह ताब्यात घेण्यात आले. चालकाला तब्बल एक लाख 90 रुपयांचे चलन देण्यात आले व परवाना रद्द करण्यात आला. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी वाहतूक उप निरीक्षक तेजस्विनी गावडे उपस्थित होत्या.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |