सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांचे बारावे वंशज आणि सातारचे माजी नगराध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या पत्नी श्रीमंत छत्रपती सौ. चंद्रलेखाराजे भोसले यांचे रविवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ७२ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर सोमवार, दि. १४ रोजी सकाळी माहूली येथील राजघाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली. त्यांच्या पश्चात पती माजी नगराध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे, दीर श्रीमंत छत्रपती विजयसिंहराजे, बंधू माजी खासदार सत्यजितसिंह गायकवाड, पुतणे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रीमंत छत्रपती विक्रमराजे भोसले, मुलगी वृषालीराजे, नातू कौस्तुभादित्यराजे असा परिवार आहे.
गुजरात येथील बडोदा शहरातील महाराजा सयाजीराव गायकवाड घराण्यात जन्मलेल्या चंद्रलेखाराजे यांनी होम सायन्समधून पदवी घेतली होती. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी विविध क्रीडा प्रकारात नैपुण्य मिळवले होते. श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या साताऱ्यात आल्या. त्यांचे निवासस्थान असलेला अदालत राजवाडा हाच त्यांच्या सामाजिक उपक्रमाचा केंद्रबिंदू अखेरपर्यंत राहिला. पश्चिम महाराष्ट्रातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. काही संस्थावर त्यांनी स्वत: प्रतिनिधित्व केले. महिला मंडळाची शाळा, विविध सामाजिक संस्थांच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. सातारा शहरातील धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा. त्या सातारा जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या आजीव सदस्या होत्या. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज सेवाधाम संस्थेच्या अध्यक्षा तसेच सातारा येथील रामकृष्ण सेवा मंडळाच्या त्या सलग २१ वर्षे अध्यक्षा होत्या. शिवभारती महिला मंडळाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी काम पाहिले. सातारा तालुक्यातील आरे येथील भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी काम पाहिले. आता त्या येथे संचालिका म्हणून कार्यरत होत्या. या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजू विद्यार्थ्यांना मदत केली होती.
गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्यावर सातारा व पुणे येथील रुग्णांलयामध्ये उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर अदालत राजवाडा येथेच उपचार सुरु होते. दरम्यान, रविवारी दुपारच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच साताऱ्यातील विविध सामाजिक संस्थाचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सातारकर नागरिकांनी अदालत राजवाडा येथे धाव घेतली. दरम्यान, सोमवारी सकाळी नऊ वाजता त्यांची अंतयात्रा निघणार असून अदालत राजवाडा निवासस्थान, नगरपालिका, पोवई नाका, राजघाट असा मार्ग आहे. माहूली येथील राजघाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयंकडून देण्यात आली.
श्रीमंत छत्रपती सौ. चंद्रलेखाराजे भोसले यांनी अनेक वंचित घटकांना मदत केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट, इतिहास, लढाया हा प्रत्येकाला अवगत असावा, ज्ञात असावा यासाठी त्या अविरत कार्यरत राहिल्या. अजिंक्यतारा किल्ला परिसरात भव्य अशी शिवसृष्टी, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, सभागृह, अभ्यासिका उभी करण्याचे तसेच राजघाटावर राजघराण्यातील अनेकांच्या समाधी असून त्यांचा जिर्णोद्धार करण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यांनी अनेकदा तसे बोलून ही दाखवले होते आणि प्रत्यक्षात त्याचा आराखडा तयार करण्याचे काम ही त्यांनी सुरू केले होते. यासाठी त्यांनी दोन वर्षांपूर्वी किल्ले अजिंक्यतारा शिवस्मृती प्रतिष्ठान स्थापन केले होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |