03:57pm | Nov 28, 2020 |
अजित जगताप
सातारा: सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी त्यांच्या यशस्वी कारकिर्दीत जिहे -कठापुर योजनेला गती दिली. आजही मंत्री नसतानाही त्यांनी माण-खटावला पाणी देण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. त्यामुळे दुष्काळी भागात उन्हाळ्यात पाणी मिळणार आहे. हा एक प्रकारे दिलासादायक संदेश असल्याचे मत दुष्काळी भागात व्यक्त होत आहे. माण-खटाव दुष्काळी भागातील शेतकरी व इतर जनतेला पाणी देण्यासाठी खर्या अर्थाने माजी पालकमंत्री विजय शिवतारे हे दुष्काळी भागातील जनतेच्या मनातील ताईत ठरले आहेत, अशी भावना खटाव तालुक्यातील 16 व माण तालुक्यातील 19 गावाच्या परिसरातील ग्रामस्थांची झाली आहे.
नेर ते आंधळी धरण असा सतराशे मीटर बोगद्यातून दुष्काळी भागात पाणी पुरवठा करून खर्या अर्थाने तहानलेल्या लोकांना पाणी देण्याचे कार्य माजी पालकमंत्री विजय शिवतारे यांनीच केले आहे. 1996 साली सांगली जिल्ह्यातील विटा, आटपाडी भागाला पाणी देण्यासाठी कराड नजिक कृष्णा नदीच्या काठावर टेंभू योजना सेना-भाजपच्या तत्कालीन सरकारने कार्यन्वित केली होती. त्याला सत्तांतरानंतर खीळ बसली होती. पण 2014 साली भाजप-सेनेचे सरकार सत्तेवर आल्यानंतर जलसंपदा राज्यमंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दुष्काळी परिस्थितीची जाणीव ठेवून जिहे-कठापुर योजनेला निधी उपलब्ध करून हे काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला. त्याचा आता दुष्काळी भागातील दरुज, दरजाई, सातेवाडी, पेढगाव, मांडवे, एनकुळ, कणसेवाडी, मायणी येथील सोळा गावे व माण तालुक्यातील 19 गावांना लाभ मिळणार आहे. ’’’माजी आमदार डॉ दिलीप येळगावकर यांनी रचला पाया, माजी मंत्री विजय शिवतारे झाले कळस’’’ असे वर्णन केले जात आहे. कोणतीही खोटी माहिती प्रसिद्ध न करता जे यश मिळाले हा सत्याचा विजय असल्याची माहिती आता भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुध्दा देऊ लागले आहेत. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे असे सामाजिक कार्यकर्ते दत्ता केंगरे, रमेश बोराटे,प्रताप जाधव यांनी मत व्यक्त केले आहे. सत्ता नसतानाही माजी पालकमंत्री, माजी आमदार यांनी केलेला अभूतपूर्व प्रयत्न माण-खटावची जनता कदापि विसरणार नाही. हे यानिमित्त सिद्ध झाले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |