09:15pm | Mar 16, 2022 |
कराड : स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांचे येथील भेदा चौकात भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकस्थळास शंभूतीर्थ असे संबोधण्यात येणार असून देशातील एक भव्य स्मारक उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या स्मारकासाठी शासकीय परवानग्यांसाठी प्रयत्न सुरू आहेत. लोकसहभागातून या स्मारकाची उभारणी करण्यात येणार असल्याने कराड तालुक्याचा सहभाग या महत्वपूर्ण कार्यात घेण्याचा निर्णय स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीच्या आढावा बैठकीत घेण्यात आला.
येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी १६ रोजी ही आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस समितीचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, विविध पक्षांचे व संघटनांचे पदाधिकारी आणि शिवशंभूप्रेमी तरूण मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कराड शहरात छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक व्हावे, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या मागणीस अनुसरून प्राथमिक स्तरावर स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीची स्थापना करून यासाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. नगरपालिकेकडे भेदा चौकातील साईट व्ही या जागेची मागणी करण्यात आली होती. त्यास मान्यता देण्यात आली आहे. या जागेत भव्य स्मारक उभारणीसाठी शासनाच्या विविध परवानग्यां घेण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. एकूण 55 फुटांचे स्मारक होणार असून ते राज्यात सर्वाधिक उंचीचे व भव्य व्हावे, असा प्रयत्न करण्यात येणार आहे. या स्मारकात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा सुमारे 20 फूट उंचीचा असून कोल्हापूर येथील मूर्तिकार संजीव संकपाळ यांनी याचे क्ले मॉडेल तयार केले आहे. स्मारकात ग्रंथालय, म्युरल्स, अभ्यासिका असणार आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. प्रारंभी, बैठकीत या कार्यात सुरवातीपासून सहभागी असणारे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख माजी नगरसेवक रामभाऊ रैनाक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
स्मारक कराड तालुक्याला भूषण ठरेल
या स्मारकाची उभारणी लोकसहभागातून होणार आहे. हे स्मारक कराड शहरालाच नव्हे; तर कराड तालुक्यालाही भूषण ठरणार आहे. यासाठी कराड तालुक्यातील शिवशंभूप्रेमी नागरिक, तरूणांचाही सहभाग घेण्याचे निश्चित करण्यात आले. तर विविध समित्यांची स्थापना करण्यात येणार असून यात वेळ देऊ शकणाऱया तरूणांना नावनोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |