11:38pm | Aug 05, 2020 |
सातारा : जिल्ह्यात आज दिवसभरात 196 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. आज कोरोनाने पाचजणांचा मृत्यू झाला असून कोरोनाबळींचा आकडा दीडशे पार झाला आहे. याबरोबरच 62 नागरिकांना कोरोनातून ठणठणीत झाल्याने घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबता थांबण्याचे नाव घेत नसल्याचे पुढे येत आहे. जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य अधिकारी कसोशीने प्रयत्न करीत असूनही कोरोना रुग्णांची वाढती संख्या जिल्ह्यापुढे चिंतेचे मळभ दाटच करीत आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात 196 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा 4976 झाला आहे. तसेच आज पाचजणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींचा आकडा दीडशे पार झाला आहे. दरम्यान आज विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 62 नागरिकांना दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे -
कराड तालुक्यातील कापील येथील 26 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 24 वर्षीय महिला, कालवडे येथील 30 वर्षीय महिला. खंडोबानगर (मलकापूर) येथील 4 वर्षीय बालक, वडगाव हवेली येथील 43 वर्षीय पुरुष., पाटण तालुक्यातील नेरले येथील 23 वर्षीय पुरुष., कासरुंड येथील 12, 17 वर्षीय युवती व 35 वर्षीय महिला., निगडे येथील 45 वर्षीय पुरुष., वाई तालुक्यातील वेळे येथील 40 वर्षीय महिला., सातारा तालुक्यातील कण्हेर येथील वय 22, 40, 40, 34, 90, 40, 25, 62, 30, 54, 18,40, 37 वर्षीय महिला व वय 51, 50, 40, 56, 55, 7, 22, 11, 36, 5, 57, 16, 12, 16, 65 वर्षीय पुरुष., तामजाईनगर सातारा येथील 44 वर्षीय महिला., लक्ष्मी टेकडी येथील वय 56, 18, 7, 42 वर्षीय महिला व वय 42, 35 वर्षीय पुरुष., सातारा शहरातील गुरुवार पेठेतील 44, 20, 42 वर्षीय महिला व 47, 19, 38,54 वर्षीय पुरुष., रामकुंड येथील 10 वर्षीय बालक, प्रतापगंज पेठेतील 38 वर्षीय पुरुष, बुधवार पेठेतील 29 वर्षीय महिला व 32 वर्षीय पुरुष., महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली येथील 23, 38 वर्षीय महिला व 45 वर्षीय पुरुष., जावली तालुक्यातील सायगाव येथील 36 वर्षीय पुरुष व 32 वर्षीय महिला., फलटण तालुक्यातील फलटण शहरातील गोळीबार मैदान येथील 53 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
450 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातरा येथील 32, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 86, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 30, कोरेगांव 4, वाई येथील 29, खंडाळा येथील 80, पानमळेवाडी 21, महाबळेश्वर 6, पाटण 13, दहिवडी 36, खावली 55, कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 58 असे एकूण 450 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.
5 कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू
कराड येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये रविवार पेठेतील कोरोनाबाधित 62 वर्षीय पुरुषांचा व सातारा येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार घेतलेल्या खटाव ता. खटाव येथील कोरोनाबाधित 75 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाले आहेत. त्यांचे खाजगी प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेले अहवाल हे कोरोनाबाधित असल्याचे कळविले आहे. तसेच आणखी तीनजणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |