04:42pm | Sep 27, 2022 |
बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरावडा निमित्त बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथे आयोजित "समाजातील बुद्धिजिवी लोकांच्या सोबत संवाद" या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शन म्हणून भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी खासदार प्रीतम मुंडे यांची विशेष उपस्थिती होती.
या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पंकजा मुंडे यांनी काँग्रेस पक्षात वंशवादाचे राजकारण सुरू आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे,असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. पंकजा मुंडे यांनी यापुढे थोडा वेळ थांबून यामध्ये मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे पण मला कोणी संपवू शकतं नाही,असं म्हटलं.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
आता ग्रामंपचायत आणि इतर निवडणुका सुरु होत आहेत. आता या निवडणुका आपण वेगळ्या पद्धतीनं लढूया, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. आपल्याला जात, पात, पैसा, प्रभाव याच्या पलीकडे जाऊन विचार करायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. मी सुद्धा वंशवादाचं प्रतीक आहे मात्र मला कोणी संपवू शकत नाही, मोदीजींनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला तर ते सुद्धा मला संपवू शकत नाहीत. जर मी तुमच्या मनावर राज्य केले तर ते तसं करु शकणार नाहीत, असं पंकजा मुंडे यांनी बोलताना म्हणाल्या.
धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका
राजकारणात आपल्याला स्वच्छता आणायची आहे. राजकारणात आपल्याला बदल करावे लागतील. राजकारणी करमणुकीचं साधन व्हायला लागले. राजकारणी तर गणेश मंडळ करा, नवरात्री करा, गरबा करा, नाटक बोलवा, तमाशा बोलवा काय चाललंय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिप्रेत नाही. आपण जुन्या पद्धतीच्या राजकारणाप्रमाणं काम करु, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे टीका केल्याचं बोललं जात आहे.
पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री व्हावं
बीड जिल्ह्याचा विकास होण्यासाठी पंकजा ताई या मागच्या पाच वर्षात पालकमंत्री असताना त्यांनी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग आणले, रेल्वे आणली, मोठे उद्योग सुरू करण्यासाठी हे मत्वाचे असते. आता परत बीडच्या पालकमंत्री पंकजा ताई झाल्या तर राहिलेला विकास सुद्धा पूर्ण होणार आहे, असं म्हणत खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना बीडच्या पालकमंत्री होण्याच्या शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर |
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर |
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीसाठी रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण |
केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर |
साताऱ्यात ८ रोजी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा मेळावा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या |
मोटर सायकल वरून पडून एकाचा मृत्यू |
सातारा शहरातील 61 जणांवर तडीपारीची कारवाई |
इलेक्ट्रिक मोटार चोरणारी टोळी सातारा जिल्ह्यातून तडीपार |
नमस्कार सातारकर, हे आहे हिंदवी 89.6... |