02:02pm | May 13, 2021 |
सातारा : भारतीय नागरिकांचा सर्व श्रेष्ठ ग्रंथ भारतीय संविधानाचे वाचन व वैज्ञानिक पद्धतीने पूजा करून कराड तालुक्यातील उंडाळे येथील प्राथमिक शिक्षक सुहास महादेव पाटील यांनी "क्रांतीबन" या नव्या बंगल्याचा वास्तुशांत विधी अनोख्या पद्धतीने पार पडला. त्यांच्या या अभिनव सामाजिक कल्पकतेचे परिसरातून कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, येथील प्राथमिक शिक्षक सुहास महादेव पाटील सामाजिक कार्यात सतत आघाडीवर असतात. अंधश्रद्धा निर्मूलन, निसर्ग संवर्धन, वृक्षारोपण, वणवाविरोधी मोहीम, जटा निर्मूलन, ग्रंथ चळवळ असे अनेक समाजोपयोगी उपक्रम ते सतत राबवत असतात. येथील क्रांती ग्रुपच्या माध्यमातून युवकांना व्यक्तिमत्व विकासासाठी मार्गदर्शन, ग्रंथालयाचे संवर्धन, काव्यवाचन स्पर्धा, गणेशोत्सवात समाजजागृतीचे उपक्रम राबवत त्यांनी आपला समाज परिवर्तनाचा लढा अखंड सुरू ठेवला आहे. त्याचबरोबर शिक्षक म्हणून काम करत आपले ज्ञानदानाचे कार्यही सुरु आहे.
शिवम प्रतिष्ठानचे डॉ. इंद्रजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांच्या उच्च करियर साठीही त्यांचे सतत प्रयत्न सुरू असतात. अशा प्रकारे समाजपरिवर्तनासाठी सदैव तत्पर असणाऱ्या पाटील गुरुजींनी नुकतेच नवीन घर बांधले. घराचे बांधकाम पूर्ण होताच त्यांनी त्यांच्या सामाजिक विचारसरणीप्रमाणे 'क्रांतीबन' असे आपल्या बंगल्याचे नामकरण केले. या घराचा वास्तुशांत समारंभ पारंपारिक पद्धतीने न करता त्यावरील अनाठायी खर्च टाळून तो पैसा विविध सामाजिक संस्थांना मदत म्हणून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यानुसार धार्मिक विधी ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमा व पुस्तके यांची पूजा मांडण्यात आली. माती, बियाणे, वृक्ष यांचे पूजन करून वास्तुशांत समारंभ करण्यात आला. भारतीय संविधानाचे वाचन करुन गृह प्रवेश केला. तसेच उपस्थितांना ग्रंथ भेट दिली.
डॉ. सुधीर कुंभार, माजी प्राचार्य बी. पी मिरजकर, धनंजय पवार, सुहास प्रभावळे, महादेव पाटील, सौ. सुप्रिया पाटील, सौ. सारिका पाटील, सुनिल पाटील, अवधूत व सुयश व कुटुंबिय यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. वास्तुशांत समारंभाच्या होणाऱ्या खर्च पैशातून दहा सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना प्रत्येकी हजार रुपये याप्रमाणे दहा हजार रुपये मदत करण्यात आली. तसेच पाच विद्यार्थी शाळेसाठी दत्तक घेतले आहेत.
जुन्या रुढी परंपरा पाळण्याऱ्यांना कॊरोना महामारीमुळे बंधने घातली गेली आहेत. देव-धर्मापेक्षा विज्ञानच आपणास वाचवू शकते, म्हणून सर्वत्र लस घेण्यासाठी गर्दी होत आहे. त्यातच समाजपरिवर्तनाचा संदेश देणारा वास्तुशांत समारंभ सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचे सर्व लोकांनी अनुकरण केल्यास वास्तू व मन:शांती लाभेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |