10:50pm | Oct 15, 2020 |
फलटण : रस्त्यावरील पुल वाहून गेल्याने फलटण तालुक्यातील बोडकेवाडी गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. फलटणच्या दक्षिणेला डोंगराच्या पायथ्याशी बोडकेवाडी हे छोटे गाव वसलेले आहे. या गावातून तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी गिरवी गावातून रस्ता आहे. या रस्त्यावरील गिरवी गावातील जानुबाई च्या ओढ्यावरील दगड मातीचा भराव घातलेला पुल वजा रस्ता आहे. बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे हा मातीचा बांध वाहून गेला आहे, त्यामुळे गावाचा ईतर गावाशी संपर्क तुटला आहे. हवामान खात्याने केलेल्या चक्रिवादळाच्या सुचनेप्रमाणे या भागात गेले तिन दिवस झाले रिमझिम पाऊस पडत होता. परंतु बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढला व या भागात दमदार पाऊस झाला, त्यामुळे या ओढ्यावरील पूल वाहून गेला आहे.
बोडकेवाडी गाव हे फलटण तालुक्यातील शंभूमहादेवाच्या डोंगर रांगेत वसलेलं एक छोटं खेडेगाव आहे. परंतु बाबा आदमच्या काळापासून या गावच्या रस्त्यावर पुल बांधला गेला नाही. तरी तालुक्याच्या गावी जाण्यासाठी गावातील लोकांची गैरसोय होवू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर या ठिकाणी पुल बांधावा, अशी मागणी गावातील ग्रामस्थांनी केली आहे.
एरवी या भागात पावसाचे प्रमाण खूप कमी असते. परंतु या अलिकडच्या काळात दोन-तीन वर्षांमध्ये या ठिकाणी दमदार पाऊस पडत असल्यामुळे प्रत्येक वर्षी हा मातीचा भराव घातलेला पुल वाहून जातो व बोडकेवाडीचा तालुक्याची संपर्क तुटत असतो. रूग्ण, बालक, वृद्ध, महिला, विद्यार्थी, नोकरदार वर्ग यांना नाईलाजास्तव पाण्यातून वाट काढून जावे लागत आहे. त्यामुळे बोडकेवाडी ग्रामस्थांतर्फे प्रशासनाकडे वारंवार तक्रार व पुलाची मागणी करूनही प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे. तरी लवकरात लवकर याठिकाणी पूल बनवून बोडकेवाडी करांची होणारी गैरसोय टाळावी, असे मागणी बोडकेवाडी ग्रामस्थ करत आहेत.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |