05:14pm | Jun 10, 2023 |
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 24 व्या वर्धापनदिनानिमित्त सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश साळुंखे व सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पत्रकार हरिष पाटणे, धनराज जगताप, चंद्रकांत देवरुखकर, उमेश भांबरे यांचा शाल, फेटा व श्री शरद पवार साहेबांची राजकीय आत्मकथा असलेले लोक माझे सांगाती पुस्तक जिल्हाध्यक्ष श्री. सुनील माने यांच्या हस्ते भेट देऊन प्रातिनिधिक स्वरुपात गौरव करण्यात आला.
सध्या देशासह महाराष्ट्रात ज्या प्रकारे सामाजिक वातावरण कलुषित करुन सर्वसामान्य जनतेच्या मनात भय निर्माण करण्याचा जो प्रकार सुरु आहे. तो राजकीय पक्षांच्या सामाजिक बांधिलकीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. राजकारण व समाजकारणात सर्व जनता निभर्यपणे जगेल व देशाच्या विकासात योगदान देईल यासाठी तसे वातावरण निर्माण करणारे नेते व राजकीय पक्ष जनतेला अपेक्षित आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून खूप अपेक्षा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी केले. श्री. सुनील माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 24 व्या वर्धापनदिनानिमित्त पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाळेमुळे तळागाळापर्यंत पोहोचलेली असून जनतेचा हाच विश्वास सार्थ ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्यरत राहिले पाहिजे. सामाजिक वातावरण दुषित करण्याचा काही प्रवृत्तींचा प्रयत्न सुरु असून अशा वेळी समाजाला धीर देण्याचे काम जबाबदारीने केले पाहिजे. पवार साहेबांनी सर्वांना बरोबर घेवून जाण्याचा जो आदर्श घालून दिलेला आहे. त्यांच्या विचाराने वाटचाल करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून समाजाच्या विकासाची भूमिका पार पाडावी, असे आवाहन श्री. सुनील माने यांनी केले.
सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. हरिष पाटणे म्हणाले, लोकशाहीत सामाजिक वातावरण कलुषित न होता सर्वांना निर्भयपणे जगता येणे हा नागरिकांचा हक्क आहे. या हक्काची पायमल्ली होण्याचे प्रकार घडत असून जातीय, धार्मिक तेढ निर्माण होत असल्याने सामाजिक शांतता धोक्यात येत आहे. अशा वातावरणात लोकशाहीचे मुल्ये पायदळी तुडवली जातात. देशातील, राज्यातील व आपल्या गावातील, परिसरातील कायदा, शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी जेवढी प्रशासनाची आहे, त्याहून अधिक ती प्र्रत्येक नागरिकाची देखील आहे. यामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांनी देखील कर्तव्यनिष्ठतेने समाजाला जागरुक करण्याचे काम केले पाहिजे. तसेच सत्ताधारी, विरोधक असलेल्या राजकीय पक्षांनी देखील जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे.
श्री. चंद्रकांत देवरुखकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सातारा जिल्ह्याने भरुभरुन प्रेम केले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांना मानणारा हा जिल्हा आहे. सध्याच्या वातावरणात राजकारणाच्या पलिकडे जावून सामाजिक बांधिलकीतून काम करण्याची गरज असून ती जबाबदारी पार पाडण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक घटकांनी करावा. महाराष्ट्राच्या विकासात्मक वाटचालीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मोलाचे योगदान असून पक्षाचा येणारा प्रत्येक वर्धापनदिन देदिप्यमान ठरावा.
यावेळी राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश साळुंखे यांनी सुत्रसंचालन केले तर अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष शफिक शेख यांनी आभार मानले. यावेळी शहाजीराव क्षीरसागर, अमित कदम, राजकुमार पाटील, युवराज पवार, नागेश साळुंखे, समिंद्रा जाधव, संजना जगदाळे, अतुल शिंदे,शफिक शेख, स्मिता देशमुख, पूजा काळे, शशिकांत वाईकर,प्रकाश येवले,शुभांगी कांबळे, संजय पिसाळ, संतोष ननावरे, विद्या नलावडे, कुसुमताई भोसले, वैशाली सुतार, नलिनी जाधव, स्वप्निल वाघमारे, सचिन जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर |
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर |
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीसाठी रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण |
केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर |
साताऱ्यात ८ रोजी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा मेळावा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या |
मोटर सायकल वरून पडून एकाचा मृत्यू |
सातारा शहरातील 61 जणांवर तडीपारीची कारवाई |
इलेक्ट्रिक मोटार चोरणारी टोळी सातारा जिल्ह्यातून तडीपार |
नमस्कार सातारकर, हे आहे हिंदवी 89.6... |