11:32pm | Aug 01, 2020 |
सातारा : शुक्रवार व शनिवार जिल्ह्यासाठी घातवार ठरले असून या दोन दिवसांत कोरोनाचे तब्बल 405 रुग्ण निष्पन्न झाल्यामुळे कोरोनाबाधितांची जिल्ह्यातील एकूण संख्या 4252 वर पोहोचली आहे. शनिवारी दिवसभरात सहाजणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या 136 वर पोहोचली आहे. तर, जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरु असलेल्या 48 कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज दिला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
दरम्यान, आज निष्पन्न झालेल्या 202 बाधितांची विस्तृत माहिती जिल्हा प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत मिळाली नाही. शनिवारी कोरोनातून खडखडीत बर्या झालेल्या 48 नागरिकांमध्ये महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली येथील 40 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला., खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील 42 वर्षीय पुरुष., सातारा तालुक्यातील जिहे येथील 70 वर्षीय महिला, क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील 39, 48, 41 वर्षीय महिला 42 वर्षीय पुरुष, व्यंकटपुरा पेठ येथील 64 वर्षीय महिला, करंडी येथील 65 वर्षीय महिला, देगाव फाटा येथील 34 वर्षीय महिला, गजेगाव येथील 25 वर्षीय महिला, कण्हेर येथील 65 वर्षीय पुरुष व 50 वर्षीय महिला, तामजाई नगर येथील 5 वर्षीय बालिका, सदरबझार येथील 21, 27, 30, 25 वर्षीय पुरुष व 40, 43 वर्षीय महिला, नवीन एमआयडीसी येथील 2 वर्षीय बालिका, शिवनगर एमआयडीसी येथील 58, 30, 28, 45 वर्षीय पुरुष 13 वर्षीय बालक व 25, 55 वर्षीय महिला, करंजे येथील 34 वर्षीय पुरुष., कोरेगांव तालुक्यातील कालवडी येथील 55 वर्षीय महिला., कराड तालुक्यातील वाण्याचीवाडी येथील 62 वर्षीय महिला, मिरगाव येथील 31 वर्षीय महलिा, मलकापूर येथील 32,24 वर्षीय पुरुष, किवळ येथील 69 वर्षीय पुरुष, कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 27 वर्षीय डॉक्टर 31 वर्षीय महिला, टेंभू येथील 40 वर्षीय महिला, बुधवार पेठ येथील 61 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 31 वर्षीय महिला., पाटण तालुक्यातील महिंद येथील 58 वर्षीय पुरुष, नेरले येथील 35 वर्षीय पुरुष, कालगांव येथील 20 वर्षीय तरुणी, खाले येथील 31 वर्षीय पुरुष, तारळे येथील 22 वर्षीय तरुण., वाई तालुक्यातील दत्त नगर येथील 32 वर्षीय पुरुष, शेंदुरजणे येथील 40 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. दरम्यान, शनिवारी दिवसभरात कोरोनामुळे सहाजणांचा मृत्यू झालेला आहे. आज सकाळी प्राप्त झालेल्या रिपोर्टनुसार क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे येवती ता. कराड येथील 75 वर्षीय पुरुष व झिरपवाडी ता. फलटण येथील 80 वर्षीय पुरुष या दोन कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सातारा येथे खाजगी हॉस्पिटल मध्ये गुरुवार पेठ येथील 25 वर्षीय कोविड बाधित पुरुषाचा व वाई येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये सोनगीरवाडी ता. वाई येथील 35 वर्षीय कोविड बाधित महिला तसेच सातारा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये परखंदी, ता. वाई येथील 81 वर्षीय महिला व गोडोली ता. सातारा येथील 64 वर्षीय महिला अशा 6 कोविड बाधितांचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
559 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 28, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 81, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 41, कोरेगांव येथील 22, वाई येथील 22, खंडाळा येथील 95, रायगाव 30, पानमळेवाडी 96, मायणी 58, व कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 86 असे एकूण 559 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |